शिरूर वाहतूक शाखेकडून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
शिरूर ama9 वृत्तसेवा शिरूर पोलीस स्टेशन, वाहतूक शाखेमार्फत दिनांक १७ रोजी शिरूर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्मल प्लाझा, सिटीबोरा कॉलेज रोड अशा गर्दीचे ठिकाण मोटर सायकल ला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, ग्रुपचे नाव लिहणे अशा मोटर सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, इतर मोटर सायकल चालकांवर लायसन नसणे – 5000/- दंड, ट्रिपल सिट – 1000/- दंड, विना कारण हॉर्न वाजवणे – 1000/- दंड अशा प्रकारे एकूण 32 मोटर सायकलवर कारवाई करून
त्यांच्याकडून तब्बल 65000/- रुपये दंड वसूल करणेत आला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेने दिली . सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी केलेली आहे. तसेच यापुढे कॉलेज रोडला विनाकारण फिरणारे मोटर सायकल स्वार व 18 वर्षा खालील वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने दिला आहे . फोटो ओळी वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करुन वाहने ताब्यात घेतल्या नंतर वाहतूक पोलीस

