शिक्रापूर – आवकाळी पावसाने शेतातील पिके जमीनदोस्त…
शिक्रापूर (Shikrapur) (ता. शिरुर) सह परिसरात अचानकपणे पावसाने
लावलेल्या हजेरीमुळे काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत तर काही ठिकाणी पिके
जमीनदोस्त झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . शिक्रापूर (Shikrapur)
येथील दत्तात्रय तोडकर यांनी शेतात पेरलेल्या २ एकर ज्वारीचे (sorghum) पिक
पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे.
शिक्रापूर: शिक्रापूर (Shikrapur) (ता. शिरुर) सह आदी
ठिकाणी अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसाने कित्येक शेतकऱ्यांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झालेले असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास
पावसामुळे पाण्यात गेला असून कित्येक पिके जमीनदोस्त झाली असल्याचे चित्र
दिसून आले आहे.
शिक्रापूर (Shikrapur) (ता. शिरुर) सह परिसरात अचानकपणे पावसाने
लावलेल्या हजेरीमुळे काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत तर काही ठिकाणी पिके
जमीनदोस्त झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . शिक्रापूर (Shikrapur)
येथील दत्तात्रय तोडकर यांनी शेतात पेरलेल्या २ एकर ज्वारीचे (sorghum) पिक
पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
आहे. २ एकर ज्वारी पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे ६० हजार
रुपयांचे नुकसान झाले आहे, तर चालू वर्षी शेतातील पिके चांगल्या प्रकारे
उभी असतानाच अचानकपणे पावसाने हजेरी लावल्याने जोमाने उभी असलेली पिके
अचानकपणे पाण्यात गेली असताना पिके जमीनदोस्त झालेली आहे त्यामुळे शेतकरी
चिंताग्रस्त झालेली असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई
देण्याची मागणी शेतकरी करत आहे.