शिरूर तालुका

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खंडाळे येथील सुजाता नरवडे यांनी अर्ज केला दाखल

 शिरूर ama9 वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खंडाळे (तालुका शिरूर) येथील माजी सरपंच खरेदी विक्री संघाच्या संचलिका सुजाता नरवडे यांनी महिला राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 



शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता नरवडे यांनी अर्ज दाखल केला असून या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की,आमदार पवार यांनी शिरूर हवेलीत मतदार संघात विकास कामे करून एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे भविष्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत असेच काम मी करेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष रवींद्र काळे , पुणे जिल्हा नियोजन समितीचे संचालक पंडित दरेकर, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघ सभापती राजेंद्र नरवडे, कोंढापुरीचे माजी आदर्श सरपंच स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो ओळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी माजी सरपंच खरेदी विक्री संघाच्या संचलिका सुजाता नरवडे यांनी महिला राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या वेळी उपस्थित  मान्यवर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button