PIMPRI

शिरुर : कांदा पिकाचे पंचनामे व्हावे , वीज बीलात सवलत द्यावी. व मृत मेंढ्यांच्या मालकांना अर्थिक सहाय्य करण्याची मागणी

 शिरूर वृत्तसेवा :कांदा पिकाचे पंचनामे व्हावे , वीज बीलात सवलत द्यावी. व मृत मेंढ्यांच्या मालकांना अर्थिक सहाय्य करण्याची मागणी 

जिल्हाधिकारी व कृषीमंञी दादा भुसे यांच्याशी पञ व्यवहार करुन करणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पिंपरी दुमाला ता. शिरुर येथे थंडीने मृत पावलेल्या मेंढ्यांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

   .शेतकरी अर्थिक अडचणीत असल्यामुळे वीजबील भरण्यासाठी मुदत वाढीची मागणी व वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी ही संबंधित अधिका-यांना पञ व्यवहार करुन करण्यात येईल. असे ही आढळराव यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या संततधार पावसाने आणि थंडीने गारठून ७७ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तसेच या ठिकाणच्या अजूनही काही मेंढ्या अत्यवस्थ अवस्थेत असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी मध्यरात्री पासुनच शिरूर तालुक्‍यात मोठया प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच थंडगार वारे वाहत असल्यामुळे मेंढ्या पावसाने व थंडीने गारठून अत्यवस्थ झाल्या अन्  त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या या संकटाने  मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिरुर तालुक्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पाऊस सुरु झाल्याने थंडीने मेंढ्या गारठल्या मेंढपाळांच्या रात्री हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेकोटी पेटवून या मेंढ्यांना ऊब देण्याचा प्रयत्न मेंढपाळांनी केला मात्र तो असफल ठरला. या सर्व मेंढ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व मेंढ्या उघड्यावर असल्यामुळे पावसाने आणि थंडीमुळे मेंढ्या काकडल्या. मात्र हतबल झालेले मेंढपाळ काहीच करू शकले नाहीत.
सकाळी मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली या वेळी सर्वत्र मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. अशाही अवस्थेत वरून संततधार पावसाची धार चालू होती. तर दुसरीकडे अंग गारठून टाकणारा गारवा अंगाला झोंबत होता. हे दृष्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
          पिंपरी दुमाला येथे काही मेंढपाळांच्या  मेंढ्या काल झालेल्या पाऊस  व अति थंडीमुळे मृत्यूमुखी पडल्या याची माहिती पिंपरी दुमाला शिवसेनेचे शाखाप्रमुख विलास मासाळकर यांनी शिवसेनेचे युवा नेते शेतकरीसेनेचे उपजिल्हाप्रमुख.भरत थोरात यांना फोन द्वारे दिली भरत थोरात यांनी काही वेळात पिंपरी दुमाला या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शिवसेना उपनेते व माजी खासदार.शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्वरीत फोन करून पंचनामा करून देण्याची मागणी केली आढळराव पाटील यांनी  तात्काळ शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना फोन करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने सुद्धा कुठलाही विलंब न लावता सर्व मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचा पंचानामा तात्काळ केला व पंचनामा केलेल्या मेंढ्यांची शासकीय मदत लवकरच संबंधित मेंढपाळ बांधवांना शिवसेनेच्यावतीने पाठपुरावा करून देण्यात येईल. असे ही आढळराव यांनी सांगितले.
    या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार , 
शिवसेना सल्लागार अनिल काशीद , शेतकरीसेना उपजिल्हाप्रमुख श्री.भरत थोरात , शिरुर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय देशमुख , 
शिवसेना विभाग प्रमुख विशाल सोनवणे ,शिवसेना शाखाप्रमुख विलास मासाळकर ,पिंपरी दुमाला गावचे उपसरपंच
माणिक मासाळकर ,पिंपरी दुमाला गावचे ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर ,  सुनिल सोनवणे , भरत खेडकर , ईश्वर बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button