SHIKRAPURपुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिक्रापुर गुन्हे शोध पथकाची दमदार कारवाई
तब्बल अकरा गुन्हे उघडीस आणले

शिरुर ama9
शेतातील महावितरणाच्या विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणारे जेरबंद करण्यात शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असुन सदर गुन्हेगाराकांकडुन अकरा गुन्हे उघडीस आले आहे या कामगीरीबद्दल शिक्रापुर गुन्हे शोध पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
या बाबत माहीती पुढील प्रमाणे शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतातील विद्युत रोहीत्रांमधील तांव्याच्या तारा चोरीच्या गुन्हयामध्ये मागील ३ महीन्यांमध्ये वाढ झाली होती. सदरचे विद्युत रोहीत्रामधील विज ही शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पाणी देण्यासाठी उपयोगात येत असुन विद्युत रोहीत्र चोरी नंतर शेतकऱ्यांची पाण्याविना पिके जळुन जाऊन शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. विद्युत रोहीत्र चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेवुन विद्युत रोहीत्र चोरीला आळा घालण्याचे मोठे आव्हान शिक्रापुर पोलीसांपुढे होते. त्यासाठी दिपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे बाबत गुन्हे शोध पथकाला सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे शिक्रापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विद्युत रोहीत्र चोरीच्या गुन्हयांचा सखोल तपास करून सी.सी.टी.व्ही. फुटेजव्दारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींची माहीती काढली. सदर आरोपींची माहीती घेवुन आरोपी सागर शिवराम जाधव, वय ३० वर्षे, रा. म्हाळुंगे पडवळ, ता.आंबेगाव, जि.पुणे, राजु प्रभु पारधी, वय ४० वर्षे, रा. जवळके बु।। ता. खेड, जि.पुणे, राहुल संतोष मधे, वय २५ वर्षे, रा. कडाळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे, किरण गोवींद खंडागळे, वय ३० वर्षे, रा. जवळके बु।। ता. खेड, जि. पुणे यांना ताब्यात घेतले. नमुद आरोपींनी शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळया ठिकाणच्या विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करून त्यापैकी काही तारा नारायणगाव येथे एकास विकल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे चोरीचा मुद्देमाल स्विकारणारा आरोपी क पांडुरंग दशरथ वायकर, वय ४० वर्षे, रा.नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे यास ताब्यात घेतले असता त्याने देखील विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा विकत घेतल्याचे कबुल केले. नमुद आरोपींना गुन्हा नोंद कमांक १५५/२०२५ भारतीय विद्युत कायदा कलम १३६ या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अटक आरोपी यांना दिनांक २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेली १ इको कार, १ पिकअप गाडी, १ पल्सर मोटार सायकल यासह गुन्हयातील चोरलेले तब्बल १९० किलो विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा असा एकुण ११,९५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपींनी तपासामध्ये एकुण ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मारकड हे करीत आहेत.
यातील आरोपींकडुन एकुण ११ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे, प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक शिक्रापुर पोलीस स्टेशन, महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक यांचेसह ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोहवा/श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, पोकों/नारायण वाळके यांचे पथकाने केली आहे.


