खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीबद्दल भुमिका मांडताना काय म्हणाले मा आमदार अशोक पवार

शिरुर ama9
सहकारातील निवडणुका ह्या आज पर्यंत पक्ष विरहीत झाल्या असुन या पुर्वीच्या निवडणुकीत अनेक जणांनी मला मदत केली असुन शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवडणुकीत माझा काही रोल नसल्याची माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले .
शिरुर तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन पदाची निवडणुक सोमवार दिनांक २४ रोजी पार पडणार आहे तालुक्यात तीन वर्षांनी सहकारातील निवडणुक पार पडत आहे त्या मुळे सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे .
सतरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत बारा जागा या बिनविरोध झाल्या होत्या तर पाच जागेवर निवडणुक होउन पाच जागेवर माजी आमदार अशोक पवार यांच्या विचाराचे लोक निवडुन आले होते .
चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच कोणाचा चेअरमन होणार यावर चर्चा ह्वायला सुरवात होउन विविध अंदाज बांधले जाउ लागले .
मात्र या सर्व चर्चेला उत्तर देताना अशोक पवार यांनी सांगितले कि या सहकारातील निवडणुका आजपर्यंत पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसुन अनेक जणांनी या पुर्वी मला निवडणुकीत सहकार्य केले त्या मुळे बिनविरोध साठी सुध्दा मि सहकार्य केले मात्र आजपर्यत चेअरमन निवडणुक हि बिनविरोध पार पडल्या असुन त्या मुळे दिनांक २४ रोजी होणाऱ्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माझा काही रोल नसुन परंपरेनुसार हि निवडणुक बिनविरोध पार पडावी अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली


