पाबळ गटात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकवटले. विरोधकांचे धाबे दणाणले.

पाबळ प्रतिनिधी.
पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने जाणते व तरुण कार्यकर्ते एकदिलाने एकवटल्याने व आमदार दिलीप वळसे पाटील यांना जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रफुल्ल शिवले पंचायत समितीचे उमेदवार वंदना प्रकाश पवार व सुचेता सनी थिटे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याची ग्वाही दिल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूर तालुका हा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मानणारा आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीतील फुटी मुळे त्यांची ताकद विभागली गेली होती. परंतु हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने भाजपामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाबळ येथे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. जुने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. विरोधक हा शेतकरी धोरण विरोधाचा पक्ष आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शेतकऱ्यांना प्रति योगदान अमूल्य आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याची प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुन्हा एकदा या शक्तीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकवटल्याचे चित्र या बैठकीत निर्माण झाले होते. या दोन्ही पक्षांची विधानसभेला मिळालेली मते एकत्रित केली तर विरोधक कुठेही आसपास फिरकताना दिसणार नाही. यामुळे विरोधकांच्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
या बैठकीच्या वेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या गटामध्ये पायाभूत सुविधांसाठी लागणारा निधी कुठेही कमी पडणार नाही. फुटकळ कामे करण्यापेक्षा रचनात्मक कामे करण्यावर भर असल्याचे सांगितले.विरोधकांचे खोटे कावे जनतेसमोर मांडण्याचे आव्हान वळसे पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्हा परिषद च्या उमेदवार प्रफुल्ल शिवले पंचायत समितीच्या उमेदवार वंदना पवार व सुचिता थिटे व मोठ्या संख्येने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


