केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी.

केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार मुसंडी.
शिक्रापूर प्रतिनिधी
वढू बुद्रुक चे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारडे केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात मतदारसंघात जड झाले आहे. कर्तुत्व व दातृत्व तत्व असलेल्या प्रफुल्ल शिवले यांच्यावर या मतदारसंघात मतदारांची मोठी श्रद्धा असून त्यांची श्रावणबाळ म्हणून झालेली प्रतिमा समाजात खोलवर रुजली आहे. संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेतृत्व या गटात मिळत असल्याने मतदार एकतर्फी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी एकवटत आहेत.
पाबळ पंचायत समिती गणामध्ये गेली तीस वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये दीर्घ योगदान असणारे बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या सुविद्यपत्नी वंदना पवार यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षाला अधिकच बळकटी मिळाली आहे. सातत्याने लोकांच्या सुख दुःखात राहणारे व दांडगा जनसंपर्क असणारे प्रकाश पवार यांना साथ देण्याची मानसिकता सर्व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर केंदुर गणामध्ये सुचिता थिटे यांच्या रूपाने सुशिक्षित व समाजसेवेचा वारसा असणारा चेहरा दिल्याने त्यांना केंदूर गणा मध्ये मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. एकंदरीत पक्षाने साधलेला तिकीट वाटपाचा योग्य संगम यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे.


