शिरूर नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची निवड जाहीर

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेचा विषय समित्यांच्या सभापती सभापती पदाची निवडणूक आज पार पडली या निवड समितीसाठी विशेष सभेचे आयोजण करण्यात आले होतं शिरूर नगर परिषदेच्या रसिक भाऊ धारिवाल सभागृहात याविषयी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे उपनगराध्यक्ष मितेश गादिया तसेच शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील उपस्थित होते
दिनांक 23 रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या सभागृहात बैठकीमध्ये विशेष समितीसाठी विषय सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले व दुपारी चार वाजता यासाठी हातवर करून मतदान घेण्यात आली यात सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शंकर जाधव यांची निवड करण्यात आली तर स्वच्छता व वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती राष्ट्रवादीचे एजाज अन्सार बागवान यांची सभापतीपदी निवड करण्यात आली तर शहराच्या महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा व जल निसारण व विद्युत समिती समिती राष्ट्रवादीशरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ सुनिता संतोष पोटे यांची निवड करण्यात आली तर नियोजन व विकास गृहनिर्माण टपरी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या स्वाती चेतन साठे यांचे निवड करण्यात आली तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे मितेश प्रदीप गादिया यांची निवड करण्यात आली तर महिला व बालकल्याण समितीचे सभापती कधी आयुष्यात कलम सय्यद या अपक्ष नगरसेविका यांची निवड करण्यात आली सर्वात महत्त्वाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे या सर्व समितीचा कार्यकाल हा एक वर्षाचा राहणार असून या सर्व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे या उपस्थित होत्या
चौकट
नगर परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झालेले सुनील शंकरराव जाधव हे मूळचे शिवसैनिक असून अनेक वर्ष त्यांनी शिरूर शहर शिवसेना प्रमुख म्हणून पद सांभाळले होते पक्षातर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले अत्यंत सामान्य कुटुंबातून असलेले सुनील जाधव हे पहिल्याच विषय समिती निवडणूकी मध्ये बांधकाम समितीचा सभापती झाले व आज शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने आज जयंतीच्या दिवशीच खऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाल्याचे मिळाल्याचे यावेळी नगरपरिषदेच्या आवारात चर्चा होती


