राजकीयशिरूर तालुका

शिरूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पदासाठी कोणाची झाली युती

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांसाठी दिनांक शुक्रवार दिनांक 16 रोजी नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये बैठकीचे आयोजन केले असून याबाबत शिरूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कोणाची निवड होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे  शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षात युती झाल्याची समजत आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे 13 नगरसेवक होत असल्याने उपनगराध्यक्षपदी यातील एका पक्षाच्या सदस्यांची निवड निश्चित मानली जात आहे उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष च्या सदस्यांची निवड होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

 नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी लागल्यानंतर शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी पक्षाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचारणे या विजयी झाल्या त्यानंतर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी व विशेष समितीच्या सभापतीपदी व स्वीकृत सदस्य पदी कोणाची वर्णे लागणार याबाबत शिरूर शहरात चर्चेला उधाण आल्या असून त्यामुळे दिनांक 16 रोजी शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आले असून या सभेला सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित राहणार आहे

नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 11 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल असून

राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची युती झाल्यास या दोन्ही पक्षांची मिळून 12 नगरसेवक अशी संख्या होऊ शकते व एक अपक्ष यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे असे मिळून 13 संख्या येऊ शकते त्यामुळे या दोन्ही पक्षातील एक जण शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवडून येऊ शकतो या दोन्ही पक्षाची युती झाल्यास त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकाची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक नगरसेवक अकरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले असून मात्र 11 नगरसेवक निवडून येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टी ही सत्तेच्या बाहेर राहत असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे सर्वाधिक नगरसेवक भाजपचे असल्याने उपनगराध्यक्षपदी भाजप विराजमान होईल असे चित्र निवडणुकीनंतर दिसत होते मात्र राजकीय घडामोडीनंतर सत्तेच्या बाहेर भाजप गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे

 

तर स्वीकृत सदस्य पदासाठी तीन सदस्य निवडले जाणार असून भाजप कडून राजेंद्र लोळगे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल चव्हाण यांचे नाव निश्चित झाल्याचे राजकीय समजते 

तीन जणांनी स्वीकृत साठी अर्ज भरल्याने हे तीन जणांची निवड निश्चित मानले जात आहे.

                               चौकट

शिरूर नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच पती-पत्नी हे दोन्ही नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून विराजमान झाले असून नगराध्यक्षपदी ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची जनतेतून निवड झाली असून तर त्यांचे पती माजी नगरसेवक अभिजीत गणेश पाचर्णे यांची स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती झाल्याने शिरूर नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये पती पत्नी नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून प्रथमच सभागृहात काम करणार आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button