राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरूर प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती असून या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शिवशंभू व्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचं जिजाऊ तुम्ही होतात म्हणून या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आला असून तसेच विशेष उल्लेखनीय पुरस्कार शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे तसेच आदर्श माता पुरस्कार शांताबाई शिंदे शोभाताई घावटे आदर्श समाजसेविका राणीताई कर्डिले उषाताई वाखारे तर आदर्श शिक्षिका साधनाताई शितोळे यांना यावेळेस सन्मानित करण्यात येणार आहे
जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले असून शहरातील सर्व शाळेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पाचवी ते दहावी या वयोगटात या स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत पहिल्या तीन येणाऱ्या स्पर्धकांना शिवचरित्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे
कार्यक्रमाला पालिकेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारिवाल शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके माजी आमदार अशोक पवार भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के पोलीस निरीक्षक संदेश केंजळे मुख्याधिकारी प्रीतम पाटील आदी उपस्थित राहणार आहे सर्व कार्यक्रम शहरातील जिजामाता गार्डन येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे शामकांत वर्पे उमेश शेळके जयवंत साळुंखे यांनी दिली यांनी दिली


