राजकीयशिरूर तालुका

नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे हे आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार

शिरूर प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे हे आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांनी दिली आहे

सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या ऐश्वर्या पाचर्णे ह्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील तसेच यावेळी शिरूर लोकसभेचे माजी खासदार व म्हाडा चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे उपस्थित राहणार आहेत शिरूर नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वर सात नगरसेवक निवडून आले होते व नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे या 1925 मतांनी विजयी झाल्या होत्या त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अलका खांडरे व भाजपाच्यासुवर्णा लोळगे यांचा पराभव केला होता

जवळपास चार वर्षानंतर शिरूर नगरीला नगराध्यक्ष मिळणार असून डिसेंबर 2016 रोजी शिरुर नगर परिषदेच्या निवडणूक पार पडली होती व त्याची मुदत डिसेंबर 2021 ला संपली होती जवळपास चार वर्षे आणि एक महिना यानंतर प्रशासक राजवट होती या प्रशासकीय राजवटीत अनेक विकास कामे झाली तसेच अनेक कामांसाठी नगरपालिकेच्या कौन्सिलची मंजुरी आवश्यक असते त्यामुळे नगरसेवक नसल्याने अनेक मोठे निर्णय घेण्यात प्रशासनाला अडचण येत होती जवळपास चार वर्षे नंतर ही निवडणूक पार पडली व या निवडणुकीत अटीतटीचे झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आपला झेंडा शिरूर नगरपरिषदेवर लावला

नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच नगरसेवक पदासाठी सर्व पक्ष उतरल्याने यावेळी प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढत झाली प्रथमच पक्षाचे चिन्हावर या निवडणूका झाले या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भारतीय जनता पार्टी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदी पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली मात्र यात भाजपला 11 जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सात जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाच अपक्ष एक अशी पक्षीय बलाबल असून भविष्यात उपनगराध्यक्ष व विविध समित्यांच्या सभापती निवडणुकीसाठी कोणता पक्ष कोणाशी युती करते हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button