११ जण भाजपचे नगरसेवक झाले. पक्षाला मोठे यश निवडणुकीत मिळाले आहे – राहुल पाचर्णे

शिरूर प्रतिनिधी
भाजपाचे कार्यकर्ते जिद्दीने व ताकदीने निवडणुकीस सामोरे गेले व ११ जण भाजपचे नगरसेवक झाले. पक्षाला मोठे यश निवडणुकीत मिळवले आहे. सर्वात जास्त नगरसेवक भाजपाचे या निवडणुकीत निवडून आले. राज्यात व केंद्रात पक्षाचे शासन असून विविध विकासकामे मार्गी लावण्यात तसेच भाजपच्या नगराध्यक्ष् पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांचे मार्गदर्शन ही वेळोवेळी घेण्यात येईल असे मत भाजपा पूर्व मंडल तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी व्यक्त केले

शिरूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार ओन्ली जिम शिरूर व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या वतीने करण्यात आला होता शिरूर नगरपरिषद निवडणूकीमध्ये भाजप पक्षाचे निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकाचा शिरूर शहर भाजप महिला आघाडी व ओन्ली वुमन जिमच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविक करताना भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार म्हणाल्या की मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता उत्तम प्रकारे आपण प्रत्येक प्रभागातील कामे करावीत तसेच हा सत्कार संभारंभ नसून विजयाचा शपथ विधीच आहे
या कार्यक्रमास शिरूर तालुका भाजपाचे पूर्व मंडलचे तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश साचेव रेश्मा शेख, बेटी बचाव बेटी पढावच्या शिरूर तालुका अध्यक्षा कविता परदेशी ,दिव्यांग आघाडीच्या नयना परदेशी , नवनिर्वाचित नगरसेवक नितिन पाचर्णे ,सागर नरवडे ,संतोष थेऊरकर ,अमित कर्डिले, निलेश पवार, उमेश शेळके,सुनिता कुरंदळे ,सुनिता भुजबळ ,पूजा पोटावळे, स्विटी शिंदे, रिंकू जगताप यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रियाताई बिरादार ,उपाध्यक्षा सुष्टी करंजुले , मीराताई परदेसी ,जयश्री थिटे, सुषमा फंड यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ओन्ली वुमन्स जिमच्या ट्रेनर सुजाता पाटील यांनी केले तर आभार निलमधु शर्मा यांनी केले..


