शिरूर तालुकाशैक्षणिक

डॉ.अश्विनी विलास करंजुले यांचे युपीएससी परीक्षेत यश 

डॉ.अश्विनी विलास करंजुले यांचे युपीएससी परीक्षेत यश

शिरूर  प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मध्ये झालेल्या परिक्षेत अश्विनी विलास करंजुले यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या यशाबद्दल शिरूर शहरात आनंद व्यक्त करण्यात आला.

 

मूळ गाव पारनेर तालुक्यातील पाडळी येथील असलेल्या डॉ.अश्विनी विलास करंजुले यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिरूर येथे झाले.पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे झाले.दरम्यान त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एम ए. बायोटेक असे शिक्षण घेत असतानाच पी एच डी चे ही शिक्षण घेत डॉक्टरेट मिळवली.दरम्यान सन २०२४ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती तर नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांनी घवघवीत यश संपादन प्राप्त करत त्यांची जिल्हा युवक अधिकारी पदावर निवड झाली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. निर्णय घेताना ठाम असावे असे सांगत आई वडील यांचे लहानपणापासून मार्गदर्शन असल्याने हे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित आंबेकर,शैलेश जाधव, ओंकार भोसले, सागर नरवडे आदींच्या हस्ते डॉ.अश्विनी करंजुले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिरूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button