शिरूर तालुकासामाजिक

मातोश्री प्रतिष्ठान च्या वतीने किल्ले स्पर्धेच्या बक्षीसाचे वितरण, साठ हुन अधिक स्पर्धकांचा या स्पर्धेत सहभाग

शिरूर प्रतिनिधी

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सोशल मीडियाच्या या युगामध्ये येणाऱ्या तरुण पिढीला आपल्या किल्ल्यांचे महत्त्व व व किल्ल्यांकडे प्रेरित होऊन भविष्यातील पिढीने या किल्याचे संवर्धन करण्यासाठी पुढे येण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठान किल्ले स्पर्धेला प्रोत्साहन देत असल्याचे मत मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी व्यक्त केले आहे

मातोश्री कला क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजित केले होते या किल्ल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धकांच्या घरी जाऊन करण्यात आले या किल्ले स्पर्धेमध्ये 60 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यासाठी बक्षीस वितरण हे प्रथम पाच येणाऱ्या स्पर्धकांच्या घरी जाऊन त्यांना बक्षीस देण्यात आले या वेळी मातोश्री प्रतिष्ठानचे शैलेश जाधव सतीश केदारी ओंकार भोसले आदी उपस्थित होते

गेल्या वीस वर्षापासुन मातोश्री प्रतिष्ठान किल्ले स्पर्धा आयोजित करत असून या किल्ले स्पर्धेच्या निमित्ताने सध्याची पिढी जी सोशल मीडिया द्वारे मोबाईल मध्ये गुंतली आहे त्यांना आपल्या किल्ल्यांची माहिती मिळावी तसेच किल्ल्यांचे महत्त्व जतन करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजित केली जाते आपले देशाचे शान असलेले हे किल्ले हे तरुण पिढीत आगामी युवकांमध्ये कायम प्रेरित रहावे यासाठी मातोश्री प्रतिष्ठान दरवर्षी या स्पर्धेच्या आयोजन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी शैलेश जाधव यांनी सांगितले

या स्पर्धेमध्ये साई संदीप लंघे प्रथम क्रमांक (रोख रक्कम सन्मान चिन्ह ), अर्चना पाथरकर द्वितीय क्रमांक( रोख रक्कम व सन्मानचिन्ह ),साई श्रीकांत धोत्रे तृतीय क्रमांक ( रोख रक्कम व सन्मानचिन्ह),
रियांश पाचर्णे चतुर्थ क्रमांक ( रक्कम व सन्मानचिन्ह), चेतन संघवी पाचवा क्रमांक( रक्कम व सन्मान चिन्ह ) स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडलदेण्यात येणार आहे
या कार्यक्रमाचे स्वागत सतीश केदारी सूत्रसंचालन शैलेश जाधव व आभार ओंकार भोसले यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button