कोर्टाच्या निर्णयाधीन नसणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकर घ्या; -ॲड संग्राम शेवाळे

शिरूर प्रतिनिधी
कोर्टाच्या निर्णयाधीन नसणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकर घ्याव्यात अशी मागणी ॲड संग्राम शेवाळे यांनी केली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक नवीन प्रशासन भवन मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस जनता दल सेक्युलर महाराष्ट्रच्या वतीने ॲड. संग्रामसिंह शेवाळे उपस्थित होते. ज्या महानगरपालिकांनी व जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही तसेच कोणत्याही कारणास्तव कोर्ट निर्णयाच्या आधीन ज्या महानगरपालिका व जिल्हा परिषदा नाहीत, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर न टाकता शक्य तितक्या लवकर घेण्यात याव्यात, अशा मागणीची विनंती त्यांनी पक्षाच्या वतीने या बैठकीत केली.
या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची चर्चा संपन्न झाली. या बैठकीस राज्यातील मान्यताप्राप्त पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी तसेच राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.


