उमेदवारांची वाढली धाकधुक, समर्थक म्हणतात आमचाच नगराध्यक्ष व नगरसेवक जास्त येणार

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले असून मतमोजणीनंतर निकाल काय लागणार यावर लाखोंच्या पैज लागले आहेत सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर हे मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असून मतदान व मतमोजणी यामध्ये खूप कालावधी मिळाल्याने निकालाबाबत चर्चेला पूर्ण वेळ मिळाल्याने अनेक तर्क वितर्कना उधान आले असून प्रत्येक पक्षाचे समर्थक आपलाच पक्ष कसा विजय होईल याबाबत गणिते मांडताना दिसत आहे

नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासह 24 नगरसेवक पदासाठी ही निवडणूक पार पडली नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणी पंचरंगी लढत पाहावयास मिळाली राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भारतीय जनता पार्टी शिवसेना व अपक्ष अशी लढत झाली तर 24 नगरसेवक पदासाठी 99 उमेदवार रिंगणात होते यात सर्व पक्षाचे उमेदवार यांनी सहभाग घेतला तर काही ठिकाणी अपक्षांनी सुद्धा आपलं नशीब आजमावले सर्वांचे भविष्य मध्ये बंद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निकालाबाबत चर्चा सुरू शहरात व प्रत्येक चौकात सुरू झाली भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष आमचा होईल व 12 पेक्षा जास्त नगरसेवक आमचे होतील असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांचे म्हणणे नगराध्यक्ष सह आमचे बारा नगरसेवक निवडून येतील असे समर्थकांचे म्हणणे असून तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या समर्थकांचे नगराध्यक्षसह आमचे 14 ते 15 नगरसेवक निवडून येतील असे सांगत आहे तर नागरिकांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा असून अनेक प्रभागात क्रॉस वोटिंग झाल्याने याबाबत अंदाज वर्तविणे अवघड असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले मात्र अनेक नागरिकांनी नगराध्यक्ष पदाबाबत कोण निवडून येईल हे सांगणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले
नगराध्यक्षा l पदासाठी पंचरंगी लढत जरी असली तरी खऱ्या अर्थाने तिरंगी लढतच या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी व भाजप यातच प्रामुख्याने झाली
शिवसेना शिंदे गटाचे रोहिणी बनकर व अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांना मिळणाऱ्या मतांवर सुद्धा या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे त्यांना मिळणारी मते ही कोणाला फायदेशीर ठरतात व कोणाला नुकसानकारक ठरतात हे 21 तारखेलाच कळेल मात्र यांना पडणाऱ्या मतांवरच शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा निकाल हा बदलू शकतो हा असे राजकीय जाणकारांचे यांचे मत आहे
या निवडणुकीसाठी करोडो रुपयाचा धुराळा उडल्यानंतर उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरू झाली असून अनेक उमेदवारांनी लाखो रुपये खर्च केले असून व नगराध्यक्ष पदासाठी करोड रुपये खर्च झाल्याने जर निकाल आपल्या मनासारखा लागला नाही तर काय होईल या धाकधुकिने सर्वच उमेदवार चिंतेत असून प्रथमच शिरूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा धुराळा झाल्याने उमेदवार हे चिंतेत दिसत आहे


