गुन्हेगारीशिरूर तालुका

दरोडाच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना जेर बंद करण्यात रांजणगाव पोलीस स्टेशनला यश

शिरूर प्रतिनिधी
दरोड्याचे तयारीतील असलेल्या सहा आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे .

याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन ने दिलेली माहिती पुढील प्रमाणे दि.09 डिसेंबर रोजी रात्री डायल 112 वरती कॉलर यांनी फोन करुन कळविले की, “बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये काही चोर घुसले आहेत. त्यांच्या जवळ दांडे आणि टिकाव आहेत. तरी पोलीस मदत हवी आहे. असा कॉल आला. पो.कॉ. संतोष आडसुळ यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना सांगीतली. असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर घटनास्थळी जावुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विलास आंबेकर, पो.कॉ. उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी तात्काळ भेट दिली.

कॉलर सिक्युरीटीगार्ड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, थोड्या वेळापुर्वी कंपनी जवळून गुजरात पासिंगची गाडीतील संशयीत इसम कंपनीमध्ये चोरीच्या उद्देशाने आले होते. परंतु ते मला पाहुन त्यांचेकडील गाडीमधुन पळून गेले असल्याचे सांगीतले. सदर संशयीत इसमांचा पोलीस पथकाने खाजगी वाहनातून शोध घेत असतांना खंडाळामाथा येथे नगर-पुणे हायवे रोडलगतच्या एका हॉटेल समोर रोडवर गुजरात पासिंगची व्हॅगनर गाडीमध्ये संशयीत इसम पोलीसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पथकाने शिताफिने संशयीत इसमांना ताब्यात घेतले. सदर इसमांकडे कौशल्यपुर्वक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव, पत्ते 1) सुरेशभाई प्रभुभाई धामेचा, (2) जितेंद्र दिनेश डाभी, (3) मेहुल सुरेशभाई धामेचा, (4) भरतभाई देवजीभाई सोळंकी, (5) उत्सव जितेंद्रभाई डाभी, (6) भरतभाई जिवराजभाई कोळी सर्व रा. मोरबी-2, इंदिरानगर, थाना-बी. डिव्हिजन, ता. जि. मोरबी, गुजरात असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता भरत देवजीआई सोलंकी याच्याकडील मोबाईल मध्ये बंद पडलेल्या एका कंपनीचे फोटो मिळून आले. त्यांचेकडील व्हॅगनर गाडीची पहाणी केली असता गाडीमध्ये चोरीसाठीचे साहित्य व हत्यारे मिळुन आले आहेत.

सदर संशयीत आरोपींकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता सदर आरोपी है MIDC मधील एक बंद पडलेल्या कंपनीमधील स्क्रैप व मातीमध्ये मौल्यवान धातु मिळत असल्याच्या संशयावरुन चोरी करण्याचे हेतुने आलो असल्याची कबुली दिली. सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडुन व्हॅगनर गाडी क्र. GJ 36 L 5891, दरोडा चोरीसाठी लागणारे साहित्य टिकाव, लोखंडी टोकदार चाकु, इतर साहित्य व सहा मोबाईल असा एकूण 3,40,000/रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुध्द दरोडा चोरीचे तयारीमध्ये मिळून आले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरुर कोर्टाने दि. 12 डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची कामगीरी संदीप गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे , रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे, प्रशांत ढोले उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे. पो.हवा. विलास आंबेकर, पो, कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. माणिक काळकुटे, अजित पवार, पो.कॉ. केशव कोरडे, संदिप भांड, पो.कॉ. दळवी, यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात रांजणगाव एम आय डी सी पो.स्टे. हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button