छत्रपती संभाजी महाराज यांच्या मौजे तुळापूर (ता. हवेली) बलिदान स्थळ आणि वढू (बु.) ता. शिरुर समाधी स्थळ यांना थेट जोडणारा रस्ता व पुल बांधण्यास मंजुरी .

शिरूर प्रतिनिधी
भीमा नदीवर तुळापूर-वढू (बु.) आपटी येथे पूल बांधणे आणि सद्यस्थितीतील आपटी-वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण करणे या कामासाठी २५०.२७ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली

याबाबत आमदार माऊली कटके यांनी सांगितले की दिनांक दहा रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार ज्ञानेश्वर कटकेन सह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधानभवन, नागपूर येथे वढू-तुळापूर विकास आराखडा शिखर समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मौजे तुळापूर (ता. हवेली) बलिदान स्थळ आणि वढू (बु.) ता. शिरुर समाधी स्थळ यांना थेट जोडणारा रस्ता व पुल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे.
भीमा नदीवर तुळापूर-वढू (बु.) आपटी येथे पूल बांधणे आणि सद्यस्थितीतील आपटी-वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण करणे या कामासाठी २५०.२७ कोटी रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली असून नव्याने मंजूर झालेल्या रस्ता व पूल बांधकामामुळे आता एकूण सुधारित आराखड्याची किंमत ५३२.५१ कोटी रुपये झाली आहे.
सदरील कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांचे शिवप्रेमींनी आभार मानले आहे


