राजकीयशिरूर तालुका

दादांच्या जाण्याने राज्याची अपरिमित हानी.. प्रफुल्ल शिवले

धामारी प्रतिनिधी.
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अकाली मृत्यची बातमी कानी पडली व आपल्याला मोठा धक्का बसला. दादांचा राज्याच्या विकासामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा होता. कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये आणण्यात त्यांचे योगदान मोठे होते. आमच्यासारखे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते दादांच्या कार्य कर्तुत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले होते. प्रामुख्याने माझ्या पाबळ केंदुर गटात दादांनी उभे केलेले रस्त्याचे जाळे. महावितरण चे सबस्टेशन ग्रामीण रुग्णालय विविध विकास कामे त्यांच्या कामाची साक्ष देतात.

 

 

पाबळ केंदूर गावांना वरदान ठरणाऱ्या थिटेवाडी धरणाच्या निर्मितीमध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे शंभर टक्के योगदान आहे. या वेळी पवारांच्या सूचनेनंतर अजित दादा पवार हे पाबळ या ठिकाणी पहाटे साडेपाचच्या दरम्यान धरण स्थळावर पोहोचले होते. हा त्यांच्या कामाचा आवाका होता. माझ्या पक्ष प्रवेश यावेळी दादांनी माझ्या बाबत संपूर्ण माहिती घेतली. माझी समाजाप्रती असलेली निष्ठा कोविड काळात केलेले काम याची दखल दादांनी घेतली व मला पक्षाची पाबळ केंदुर गटातून उमेदवारी दिली. दादांनी मला दिलेली समाजाच्या सेवेची शिकवण मी जपणार असुन या भागाच्या विकासासाठी करण्यात असणारे काम हीच दादांसाठी माझी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
(प्रफुल्ल शिवले माजी सरपंच वढू बुद्रुक )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button