चासकमान, थिटेवाडी ते जेजुरी-बेल्हा रस्ता ही अजितदादांचीच पुण्याई : वंदना प्रकाश पवार

शिक्रापूर प्रतिनिधी
चासकमान कालव्याची निर्मिती, थिटेवाडी बंधारा प्रकल्प ते अगदी आजच्या काळातील जेजुरी-बेल्हा मार्गाने पाबळ परिसराला आलेली सुबत्ता ही केवळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुण्याई पाबळ परिसरासाठी कामाल आलेली आहे. पर्यायाने दादांना श्रध्दांजली अर्पण करताना त्यांच्या या भरीव कामांची आठवण होतेच होते असे भावनिक उद्गार पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील पाबळ गणाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वंदना प्रकाश पवार यांनी काढले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातून अचानक गायब होण्याचा दु:खद प्रसंग संपूर्ण राज्यावर आलेला आहे. घराघरात दु:ख व्यक्त होत असताना गावावातून त्यांना श्रध्दांजली अर्पण होत आहे. याच पार्श्वभूमिवर जातेगाव बुद्रुक, मुखई, खैरेनगर-खैरेवाडी, हिवरे आदी गावांमध्ये श्रध्दांजली अर्पण करुन सौ.पवार यांनी आज (ता.३१) धामारी (ता.शिरूर) येथे दिवंगत अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
पुणे जिल्हा दुध उप्तादक संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मला कात्रज संघाची पहिली महिला अध्यक्षा म्हणून संधी देताना अजित दादांनी जो विश्वास टाकला तो माझ्यासाठी आणि संपूर्ण आमच्या पवार परिवारासाठी सुवर्णक्षण राहिला. राष्ट्रवादी मध्ये महिलांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी दिली जाते. त्याचमुळे यावेळी सौ.वंदना प्रकाश पवार यांनाही अजितदादांनीच पाबळ गणासाठी उमेदवारीची संधी दिली असून दादांना श्रध्दांजली अर्पण करणे म्हणजे यावेळी सौ.वंदना यांना मतदान करणे असाच बाका प्रसंग आम्हा सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते व मतदारांवर आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट :
अजितदादांचे ६चे अंकशास्त्र : केशरताई पवार (मा.अध्यक्ष, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ, कात्रज, पुणे)
वय ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके आयुष्य लाभलेल्या अजितदादांनी आपल्या राजकीय जिवनात ६ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ‘६’ या अंकाचा अशा पध्दतीने अजितदादांच्या आयुष्यातील प्रभाव तमाम महाराष्ट्राला दु:खात लोटून गेला आहे. त्यांना आम्हाला श्रध्दांजली अर्पण करावी लागतेय हेच खरे आमचे दुर्दैव असेच मी म्हणेन.


