शिरूर तालुकासामाजिक

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव गणपती येथे महागणपतीस आकर्षक सजावट

शिरूर प्रतिनिधी
संकष्ट चतुर्थी निमित्त रांजणगावगणपती येथील श्री महागणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण करण्यात आले

 

संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
तसेच संकष्टी चतुर्थी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट अयोजनाने *सामूहिक अथर्वशीर्ष पठण* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके तसेच देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button