रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात मानसिंग पाचुंदकर यांनी केली विकास कामे
प्रतिनिधी शिरूर
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रांजणगाव जिल्हा परिषद गटात निवडणूक पाहावयास मिळत असली तरी जिल्हा परिषदेतील गटात मागील चार वर्षापासून शिरूर आंबेगाव विधानसभेचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी विकासकामाचा महामेरू या गटात स्थापन केलेला आहे त्यामुळे त्या रांजणगाव जिल्हा परिषद गटात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचे बोलले जात आहे
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या गटात चर्चेला अनेक ठिकाणी उधाण आल्या असून मात्र या गटातील सर्वात जास्त नागरिकांना देवदर्शन करून आणणारे मानसिंग पाचुंदकर यांची ओळख या गटात असून सर्व जाती धर्माच्या लोकांना देवदर्शन चांगले व सुलभ रीतीने करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले
रांजणगाव परिसरात पाणीपुरवठा योजना 70 कोटीची पाणीपुरवठा योजना रांजणगाव गणपती साठी मंजूर करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे रांजणगाव कारेगाव व ढोकसांगवी या गावांसाठी घनकचरा प्रकल्प तसेच सांडपाण्यासाठी गटार प्रणाली, गटातील प्रत्येक गावात मागणीनुसार ट्रांसफार्मर मंजूर करणार व गावातील लोकांच्या सुरक्षेसाठी स्टेट लाईट बसवणार प्रत्येक शाळेतील डिजिटल शिक्षण संकल्पना राबविणार
विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार सुविधायुक्त वर्गखोले उभारणार त्यांचा संकल्प असून या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटातील उमेदवार व पंचायत समिती लगणातील दोन उमेदवार केले आहे त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतल्या असून येथे दोन दिवसावर आलेल्या मतदानामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे


