RANJANGAON GANPATI

जीवनाच्या रणांगणात आम्ही यशस्वी , कारण सर तुम्ही आमच्या रथाचे सारथी या काव्य पंक्ती प्रमाणे शिक्षण घेतल्या नंतर आपल्या करिअर , संसारात यशस्वी झाल्यावर गुरुजंनाची व विद्यालयातील आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेह मेळाव्यांचे आयोजन .

 

रांजणगाव गणपती ( वार्ताहर ) जीवनाच्या  रणांगणात आम्ही यशस्वी , कारण सर तुम्ही आमच्या रथाचे सारथी या काव्य पंक्ती प्रमाणे शिक्षण घेतल्या नंतर आपल्या करिअर , संसारात यशस्वी झाल्यावर गुरुजंनाची व विद्यालयातील आठवणींना उजाळा देण्यासाठी सध्या स्नेह मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 

असाच एक आगळा-वेगळा स्नेहमेळावा वाघाळे ता. शिरुर येथील कालिकामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन २००३ साली दहावी उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. 
या सोहळ्यास निवृत्त मुख्याध्यापक मारुती थोरात , गिरमकर सर , भास्कर वाबळे सर , बाळासाहेब शेळके सर , पाटील सर , प्रदीप लोंढे व माजी विद्यार्थी  विशाल शेळके , किरण शेळके ,अमोल शेळके , अक्षय कळमकर ,सचिन पवार , राजेंद्र पवार,  रसिक चिखले ,सतीश थोरात ,बबन शेळके , मंगेश फंड , शरद नळकांडे , सचिन लष्करे , सचिन थोरात , लक्ष्मण बेंडभर , सखाराम धरणे , संपत भोसले , विकास थोरात , रमेश धुमाळ , जिजाबाई फंड ,सारिका बांगर ,शालन कारकूड , कल्पना शेळके ,वर्षा शेळके , निवेदिता थोरात
सदर स्नेह मेळाव्याचे    नियोजन विशाल शेळके आणि किरण शेळके यांनी केले तर सूत्र संचालन शरद नळकांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button