शिरूर तालुका

पाषाणमळा येथील ब्रिटीशकालीन पुलावरील झालेले अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा शिरूर शहर मनसे आंदोलन करेल – मनसे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांचा इशारा

शिरूर ama9  वृत्तसेवा 
नैसर्गिक स्त्रोत पाषाणमळा येथील ब्रिटीशकालीन पूल बुजविल्यामुळे भविष्यात तेथे पुराचा धोका निर्माण होण्याची भिती आहे . तरी पुलावरील झालेले अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा शिरूर शहर मनसे आंदोलन करेल असा इशारा
  शिरूर शहराध्यक्ष मनसे अविनाश घोगरे यांनी निवेद्नाद्वारे दिला आहे .  या संदर्भातील निवेदन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे या निवेदनात म्हटले आहे कि  पाषाण मळा येथील पुलाचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून तिथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे. शिरुर शहरातुन पुण्याकडे जाणारा हा  रस्ता आहे तो महामार्ग-९२ व ३० फुट रुंदीचा आहे. तो पाषाणमळा येथील नैसर्गिक ब्रिटीशकालीन पूल असून त्यावर अनधिकृत बांधकाम सुरु आहे. शिरूर नगरपरिषदेने  २७ मे रोजी ५३ ची नोटीस देण्यात आली. अनधिककृत बांधकाम २४ तासात स्वखर्चाने काढून टाकावे अशी नोटीस बजावण्यात आली तरीही काम चालू आहे. तरी लवकरात लवकर सदर बांधकाम काढण्यात यावे व नैसर्गिक स्त्रोत खुला करण्यात यावा अन्यथा येत्या सात दिवसांत मनसे स्टाईलने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे . 
                 चौकट
सदर अनाधिकृत अतिक्रमण न काढल्यास व ब्रिटिशकालीन पुलावरील नैसर्गिक स्तोत्र खुला न केल्यास सात दिवसानंतर पंचांग भेट देणार असल्याचे मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले . 
फोटो ओळी पाषाण मळा येथील पुणे रस्त्यावर पुलावरील नैसर्गिक स्तोत्र बंद करण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button