शिरूर तालुका
शिरूर नगरपरिषदे सार्वत्रिक निवडणुक 2022। वाचा कोणते प्रभाग आहेत आरक्षीत
शिरूर : नगरपरिषदेच्या रसिकभाऊ धारीवाल सभागृहात प्रांतअधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या उपस्थित मध्ये हि सोडत पार पडली . (Shirur Municipal Council General Election 2022. Read which wards are reserved) या वेळी शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर ,कार्यालयीन अधीक्षक अयुब सय्यद व नागरिक व,विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते .
शिरूर नगरपरिषदेची मागील निवडणुक १४ डिसेंबर २०१६ रोजी पार पडली होती . त्याची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली . त्या पुर्वी निवडणुक होणे गरजेचे असताना कोरोना व ओबीसी आरक्षणामुळे निवडणुक पुढे गेली होती . मात्र निवडणुक आयोगाच्या निर्देशानंतर हि सोडत पार पडली . नविन प्रभाग रचनेनुसार या निवडणुकीसाठी १२ प्रभाग असुन प्रत्येक प्रभागात २ नगरसेवक या प्रमाणे २४ नगरसेवक या वेळेस शिरुर नगरपरिषदेमध्ये निवडुन जाणार आहे .
असे आहे आरक्षण
आरक्षणा संदर्भात माहिती देताना प्रांतअधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले की, अनुसुचित जाती साठी लोकसंख्याच्या नुसार ३ सदस्यांसाठी आरक्षण पडणार असुन अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येनुसार १ सदस्या साठी आरक्षण पडणार आहे . त्या नुसार अनुसुचित जातीची जास्त संख्या असलेल्या ४,९,१० या प्रभागासाठी आरक्षण चिठ्या टाकण्यात आल्या . स्वराली कोठावळे,कृतिका मुत्याल या शाळेतील मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली . त्यात ९,१० हे प्रभाग अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव झाले .
तर प्रभाग क्र ४ हा अनुसुचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव झाला . अनुसुचित जमाती साठी मागील वेळेस पुरुषांनसाठी असल्याने निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार या वेळेस तो महिलान साठी राखीव करण्या आला . लोकसंख्येच्या नुसार प्रभाग क्र ११ हा महिला साठी राखीव झाला . महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने २४ पैकी १२ सदस्य या महिला असणार आहे . त्या मुळे या तीन आरक्षित महिलांच्या जागा सोडुन उर्वरित ९ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या . या सोडती कडे सर्वांचे लक्ष लागले होते . नगराध्यक्ष पद हे नगरसेवकानमधुन असणार असल्याने त्या पदासाठी कुठले आरक्षण पडते हे सुध्दा पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रभाग निहाय आरक्षण व प्रभाग रचना पुढील प्रमाणे
(कामाठीपुरा मधील काही भाग, कैकाडी आळी, साळुंखे मळा, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोरआळी, कुंभार आळीचा काही भाग, मुंबईबाजाराचा काही भाग, साईनगरचा काही भाग)
प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
(कुंभारआळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपुरा, हल्दी मोहल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार)
प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
(सोनारआळी, मारुती मंदिर परिसर, अष्टविनायक सोसायटी, खांडरेआळी, भाजीबाजार, जूना अंडे बाजार, फकीर मोहल्ला, लाटेआळी, भाजी बाजार कडील भाग, सुभाष चौक, गेंदाबाई चौक)
प्रभाग क्रमांक ४ अनुसुचित जाती सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
(सरदार पेठ, सरदार पेठ मागील बाजू, मारुती आळी काही भाग, चर्च जवळील भाग, | आंबेडकरनगर, कब्रस्थान, सुशिला पार्क, आदीनाथ नगर (खारा मळा) अमरधाम, पंचायत समिती कार्यालय परिसर, PWD कार्यालय परिसर, पांजरपोळ, भुजबळ मळा, ढोमे मळा, पाचर्णे मळा, महादेवनगर काही भाग, घोडोबा मंदीर समोरील पाचर्णे वस्ती)
प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण ,सर्वसाधारण महिला
(महादेवनगर काही भाग, संपूर्ण जोशीवाडी, विठ्ठल नगर, MSEB कॉलनी, पोलीस लाईन, तहसिल कार्यालय परिसर, स्टेट बँक कॉलनी, बायपास झोपडपट्टी)
प्रभाग क्रमांक ६ सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
(सुरजनगर, बागवाननगर, PWD वसाहत, जाधव मळा, बी जे कॉर्नर, गणेश नगर, संपूर्ण गुजरमळा) उत्तर -: सुशिला पार्क व सुरजनगरची शेवटची लाईन
प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला
(डंवेनाला, आडत बाजार, कापड बाजार, रामआळी, मारुती आळी, सरदार पेठ दक्षिण बाजू, पुणे नगर रोड, रेव्हेन्यू कॉलनी काही भाग, शांती नगर, एस टी डेपो परिसर)
प्रभाग क्रमांक ८ सर्वसाधारण ,सर्वसाधारण महिला
(कॉलेज समोरील रस्त्याने) यशवंत कॉलनी पर्यत (यशवंत कॉलनी, रयत शाळा, सैनिक सोसा. जिजामाता सोसा., शिवाजी सोसा., करंजुले वस्ती, गिता नगर, कुकडी वसाहत, रेव्हेन्यू कॉलनीचा काही भाग, कोर्ट परिसर, वसंतराव नाईक नगर) उत्तर : एस. टी. स्टॅन्ड, शांती नगर)
प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती महिला ,सर्वसाधारण
(एम एस सी बी सर्विस स्टेशन नवीन मार्केट यार्ड गुरुकुल सोसायटी,वाडावसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरानगर, सिध्दार्थनगर, मार्केट यार्ड)
प्रभाग क्रमांक १० अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
(साई नगर, काची आळी, बी. सी. हौसिंग सोसायटी, इसवे नगर, सय्यद बाबा नगर, संजय नगर, पावळ फाटा, नविन न.प. प्रशासकीय इमारत परिसर)
प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जमातीमहिला,सर्वसाधारण
(कामाठीपुरा, एस टी कॉलनी, श्री हाईटस, आनंद सोसायटी, ख्रिश्चन दफनभूमी परिसर, सर्टीफाईड स्कूल परिसर, पवार मळा, मंगलमुर्तीनगर, गादीया मळा, पाषाण मळा, वायपास रोड, दत्त मंदिर परिसर, भिल्ल वस्ती, पारधी वस्ती, जलशुध्दीकरण केंद्राजवळील झोपडपट्टी, प्रितमप्रकाश नगर, मामाजीचा मळा)
प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण ,सर्वसाधारण महिला
(संपुर्ण हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, फार्मसी कॉलेज, वाफणा मळा, दिघे मळा, वोरा मळा, शिक्षक कॉलनी परिसर, साई गार्डन परिसर, डायमंड प्लाझा सोसा. गोलेगाव रोड पश्चिमे कडील वाजू, घोडोबा मंदिर परिसर)




