शिरूर तालुका
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन कडुन मोबाईल चोरणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात
पोलीसांनी राहते घरातून चोरीला गेलेल्या तब्बल साडेचार लाख रुपये किमंतीचे ४०मोबाईल अल्पवयीन चोराकडुन हस्तगत करुन संबंधित मोबाईल चोरास ताब्यात घेतले आहे .
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी सांगितले की रांजणगाव एमआयडीसी परीसरातील कंपनी मधील कामगार एका खोलीत 3 ते 4 कामगार राहत असतात. प्रत्येक कामगारांची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने कामावर जाताना रुमचा दरवाजा उघडा ठेवून कामावर जात असतात आणि याचा फायदा मोबाईल चोरणारे चोरटे घेऊन झोपलेल्या कामगाराचे खोलीतून त्याचे मोबाईल चोरी करुन चोरटे पोबारा करत असत.बरेच दिवस मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे यांना सुचना देउन मोबाईल चोरीचा गुन्हा छडा लावण्यास सांगितले होते .त्यानुसार तपास पथकाने रांजणगाव गणपती येथे सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयितास ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्यांने रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी परिसरातील खोल्यांमधून अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली सदर चोरट्या कडुन पोलीसांनी 4,50,000/- रु किमतीचे 40 महागडे मोबाईल फोन जप्त केले आहे .
दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले आहे व उर्वरित मोबाईल चे आयएमईआय नंबर वरुन मोबाईल मालकाचा शोध घेउन गुन्हे दाखल करण्याचे काम चालु असल्याचे मांडगे यांनी सांगितले.
यासंदर्भातील अधिक तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार सुनिल नरके हे करत आहे
पोलीस निरीक्षक मांडगे यांनी आवाहन केले की झोपताना, घरातून बाहेर जाताना व्यवस्थित लॉक करावे .



