शिरूर तालुका
मनसे अध्यक्ष मा . राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिरूर शहरात साजरा
शिरूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा . राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ वाढदिवसानिमित्त शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रामलिंग येथील सिंधुताई सपकाळ मनशांती छात्रालय मध्येमुलांच्या हस्ते केक कापुन तसेच फळे ,भांड्याचा सेट या वेळी देण्यात आला .
या वेळी मनसे तालुकाअध्यक्ष तेजस यादव ,उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे ,वाहतूक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील खेडकर ,शहर अध्यक्ष अविनाश घोगरे ,हुडको कृती समितीचे शैलेश जाधव, रस्ते आस्थापनचे तालुकाअध्यक्ष सुदाम चव्हाण,शहरउपाध्यक्ष प्रवीण तुबाकी ,प्रशांत बेंद्रे ,सागर नरवडे,प्रसन्ना भोसले,चेतन तुबाकी ,अक्षय गायकवाड,ऋषिकेश घोगरे ,विलास विर आदी यावेळी उपस्थित होते .
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हुडको कॉलनी व शिरूर शहरा मध्ये पत्रके वाटण्यात आली असल्याचे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले.
चौकट
मनसे अध्यक्ष मा . राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिरुर शहर मनसेच्या वतीने अनोख्या पध्दतीने साजरा केल्याने त्यांचे शहरात विशेष कौतुक करण्यात आले .





