शिरूर तालुका

मनसेच्या वतीने शिरुर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा उतरवला

शिरुर 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागातील ५४ कर्मचाऱ्यांच्या वर्षभरासाठीचा आरोग्य विमा मोफत उतरविण्यात आला आहे .
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मनसेचे जिल्हाचे उपप्रमुख महिबूब सय्यद यांनी दिली .
शिरुर नगरपरिषदेचा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांना विमा पॉलीसी प्रमाणपत्राचे  वाटप करण्यात आले .
यावेळी शिरुर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे , मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे , मनसेच्या तारुआक्का पठारे , रविराज लेंडे , सुनील खेडकर,सुदाम चव्हाण  , डॉ .वैशाली साखरे , शारदा भुजबळ , नाना लांडे ,बजाज अलायन्स चे चंदू बोरा ,नगरपालिका स्वच्छता विभागाच्या अभियंता राजश्री मोरे  ,मनोज अहिरे  आदी  उपस्थित होते .

सय्यद यावेळी म्हणाले की शिरुर शहरात स्वच्छता ठेवण्याकामी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या विभागात ठेक्यावर काम करणा- या ५४ कर्मचाऱ्यांच्या बजाज अलायन्स संकटमोचन  आरोग्य  विम्या मनसेचा वतीने काढण्यात आला आहे . या विम्याचा काळावधी एक वर्षाचा असुन याकाळात कर्मचाऱ्यांस दुखापत अथवा अपघात झाल्यास नूकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळू शकणार आहे .शहराचे आरोग्य जपण्यासाठी व शहर सुंदर स्वच्छ रहावे यासाठी सतत ऑन ड्यूटी असणाऱ्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा विमा सामाजिक बांधिलकी मानून काढण्यात आला असून यापुढे ही विविध उपक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
फोटो ओळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शिरुर नगरपरिषद मधील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button