रांजणगाव गणपती देवस्थानकडुन मान्यवरांचा सन्मान
बारामती टेक्सटाइल पार्कच्या सुनित्राताई पवार व मनसे नेते व प्रवक्ते नितीन सरदेसाई यांचा सन्मान
शिरुर ama9
बारामती टेक्सटाइल पार्क च्या अध्यक्षा सुनित्राताई अजित पवार शिरुर तालुक्यात प्रथमच सार्वजनीक कार्यक्रमासाठी येत असताना रांजणगाव गणपती येथे महागणपतीचे दर्शन घेउन आरती केली .
शिरुर शहरात दि १५ रोजी कार्यक्रमासाठी सुनेत्राताई पवार आल्या होत्या . येत असताना रांजणगाव गणपती येथे थांबल्या या वेळी देवस्थानच्या वतिने त्यांचा श्रींची प्रतिमा देउन सत्कार करण्यात आला . सुनेत्रा ताई पवार यांच्या येण्या आधी मनसेचे नेते व प्रवक्ते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सपत्नीक महागणपतीचे दर्शन घेउन आरती केली नितीन सरदेसाई हे अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेत असुन त्या निमित्ताने ते रांजणगाव गणपती येथे आले होते त्यांचा श्रींची प्रतिमा देउन या वेळी सन्मान करण्यात आला .
या वेळी मनसे पुणे शहर प्रमुख हेमंत बत्ते ,पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास दरेकर उपस्थित होते . या वेळी मि देवदर्शनासाठी आलो असुन कुठल्याही राजकिय भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला .या वेळी राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन व उद्योजक दत्तात्रय पाचूंदकर यांच्या हस्ते सुनित्राताई अजित पवार व माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा सन्मान करण्यात आला श्रीची प्रतिमा देउन या दोघांचा सन्मान करण्यात आला या वेळी देवस्थानचे व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रविंद्र काळे उपस्थित होते . फोटो देवस्थानच्या वतिने सुनित्राताई पवार व नितीन सरदेसाई यांचा सन्मान करण्यात आला .


