पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

रांजणगाव गणपती येथे रांजणगाव ग्रामपंचायतीकडुन स्वागत

बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई अजित पवार यांचे स्वागत

शिरुर ama9 

बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई अजित पवार यांचे शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांनी रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती चे दर्शन घेतले. शिरुर शहरा मध्ये कार्यक्रमा साठी शिरूर तालुक्यात बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई अजित पवार या प्रथमच आल्या होत्या.रांजणगाव गणपती येथे दर्शनासाठी थांबल्या असत्या,त्यांचे रांजणगाव गणपती ग्रामपंचायत च्या वतीने शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी श्रींची आरती करून महागणपती चे आशीर्वाद घेतले. नंतर मंदिर आवारात त्यांचा माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश पवार,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मोनिका हरगुडे,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला सरचिटणीस वैशाली नागवडे,लोचन शिवले, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवि काळे, आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जि.प. सदस्या कविता खेडकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, रांजणगाव गणपती ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर,आंबेगाव -शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय लांडे,खरेदी विक्री संघांचे संचालक दत्तात्रय कदम, यांसह रांजणगाव गणपतीचे गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो रांजणगाव गणपती येथे स्वागत करताना पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button