पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर येथे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या वतिने होम मिनिस्टर व हळदी कुंकु कार्यक्रम

बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी केले उद्घाटन

शिरूर  ama9

शिरूरकर नेहमी अजितदादा यांच्यासोबत राहिले आहेत, प्रचंड प्रेम व साथ शिरूरकरानी दिली आहे,यापुढेही अशीच साथ कायम ठेवा असे आवाहन बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.

शिरूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रुतिका रंजन झांबरे  यांच्या वतीने  होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या. शिरुर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा कार्यक्रम प्रथम झाला असुन यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या .

यावेळी बोलताना पवार म्हणाल्या की,मी ग्रामीण भागात वाढले,ग्रामीण भागातच राहते.त्यामुळे मला ग्रामीण भागातील समस्या माहिती आहेत.काटेवाडी ग्रामपंचायत मध्ये काम पाहताना स्वच्छतेचा राज्यात प्रथम २५ लाखाचा पुरस्कार पटकावला होता.जे प्रश्न तुम्हाला असतात,तसेच प्रश्न मलाही असतात.मीही तुमच्यातील एक आहे.सर्व महिलांच्या समस्यांची मला जाणीव आहे.बारामती टेक्सटाइल पार्क मध्ये काम करत असताना अनेक महिलांना रोजगार तर दिलाच परंतु स्वतःच्या पायावर महिला उभ्या आहेत याचे मोठे समाधान मला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात प्रथम जरी मी आले असले तरी अजितदादा यांच्यावर सातत्याने शिरूर च्या जनतेने भरभरून प्रेम केले आहे.त्यामुळेच या भागातील समस्या,विकास कामे करण्यावर अजितदादा सातत्याने प्रयत्न करत असतात.जे प्रेम इथून मागे केले तसेच प्रेम या पुढेही आपण करा असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदी कुंकू समारंभानंतर वान वाटण्यात आले.तर क्रांती मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांनी होम मिनिस्टर  विविध खेळ सादर केले.या खेळात विजयी महिला सोनाली राहुल गव्हाणे,मंगल शशिकांत गायकवाड, निशा माधव सानप, वर्षा राहुल म्हस्के,माधुरी निलेश कुंभार यांना बक्षिसे देण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्षा श्रुतिका रंजन झांबरे यांनी सांगितले कि  शिरूर मधील जनता व माता भगिनी आपल्या आणि दादा च्या सोबत आहे.तसेच भविष्य काळात दादाचे आणि तुमचे हात बळकट करण्याकरिता महिला संघटन अजुन मोठ्या प्रमाणावर व्यापक करण्याचे काम मी नक्कीच प्रयत्न  करेन  असे झांबरे यांनी यावेळी सांगितले  . पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रंजन झांबरे यांनी मानले.

दरम्यान बसस्थानक व्यापारी संकुलातील पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे,पुणे जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे,माजी अध्यक्ष वैशाली नागवडे, लोचन शिवले,आर्चना शांताराम कटके, नम्रता काळे,तज्ञिका कर्डिले,पुनम मुत्याल, शिरुर शहर कार्याध्यक्ष अविनाश मल्लाव ,शहराध्यक्ष शरद कालेवार, युवक तालुकाध्यक्ष अमोल वर्पे,  युवक शहर अध्यक्ष एजाज बागवान,उमेश जाधव,ॲङ अक्षय घावटे,सुवर्णा सोनवणे,ज्योती लोखंडे,कल्पना लहू चांदगुडे,
शकील भाभी शेख,शमशाद भाभी खान,रुपाली कोठारी,शितल अळकुटे,रुपाली पवार,संजना समीर वाव्हल,राजश्री सुदाम शेजवळ,मोनिका पवन राठोड,मनीषा योगेश गव्हाणे,कोमल आत्माराम नढे,मोनिका विजय मोहिते,
सोनाली बाळासाहेब रायभोळे,दुर्गा भाऊसाहेब नन्नवरे,मनिषा टेभेकर, जिजामाता बॅंकेचे संचालिका मनिषा कालेवार, जिजामाता बॅंकेच्या उपाध्यक्षा सुरेखा शितोळे, रेशमा लोखंडे,उज्वला बरमेचा,सुर्वणा लंटाबळे,सुर्वणा लोळगे,मनिषा गावडे, संगीता शेजवळ,शाहीन पठाण,प्रियांका यादव,नंदीनी झांबरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button