शिवजयंती निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे व्याख्यान आयोजीत
व्याख्याते वसंतराव हंकारे यांच्या व्याख्यानाने अनेकांच्या डोळ्यात अश्रू
शिरूर ama9
“आयुष्यात आई वडील आपल्यासाठी अपर कष्ट मेहनत घेत असतात.त्यांचे दुःख, वेदना समजून घेऊन मार्गक्रमण करा, आई वडिलांपेक्षा जगात कोणीच मोठा नाही”.अशा शब्दात वसंत हंकारे यांच्या अनोख्या शैलीतून बाप समजून घेताना शेकडोंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचे चित्र शिरूर येथील कार्यक्रमात दिसून आले.

शिरुर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव व सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीने वसंत हंकारे यांचे ‘ बाप समजून घेताना ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी वसंत हंकारे हे बोलत होते.

यावेळी बोलताना हंकारे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आईवडिलांची मान खाली जावू नये असे कृत्य करू नये. त्याच बरोबर मुलामुलींनी फसव्या प्रेमाला भुलून चुकीचे पाऊल उचलू नये. प्रत्येक घरात जन्माला आलेले मुल चारित्र्यवान झाले पाहिजे. या मुलांना आपले आई वडील, महापुरुष कळाले पाहिजेत. आपल्या आईवडिलांची सेवा करा ते आपले दैवत आहेत.आजच्या २१ व्या शतकात माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान यामुळे जग मुठीत येवू लागले असताना मुले आपल्या आईवडिलांना विसरत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आपल्या आयुष्यात सुखाची हिरवळ फुलविण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न ,कष्ट, त्याग हे जाणून घेतले पाहिजे व या सर्वांची जाणीव ही ठेवली पाहिजे. सध्याचा युगात माणूस हरवत चालला आहे. माणूस म्हणून जगू या व माणूस घडविण्याचा ध्यास घेवू या छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी सांगितले.

यावेळी हंकारे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आणि युवकांनी हजेरी लावली होती. आयुष्यातील बापाचे महत्व हंकारे समजावून सांगत असताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
यावेळी हंकारे यांचे स्वागत सह्याद्री प्रतिष्ठानचे कुणाल काळे व त्यांच्या सहका-यांनी यांनी केले.यावेळी कुणाल काळे,अक्षय ढमढेरे,योगेश फाळके,भूषण खैरे,भूषण थोरात,विकास सांबरे,मोहित माने,सागर परभाने,गणेश पाचरने,हेमंत नेपाळी,प्रतीक गिरी,श्रेयस गायकवाड,तुषार श्रीमंत,पराग खराडे,क्षितीज वाखारे आदींनी या कार्यक्रमासठी परिश्रम घेतले .


