जखमी रुग्णास स्वताच्या गाडीत घेउन रुग्णालयात केले दाखल
जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी केली मदत
शिरूर ama9
रात्रीची वेळ..रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडलेला युवक…कुणीही थांबत नाही…अशातच एक वाहन थांबते अन् जखमींच्या युवकाला थेट स्वतःच्या गाडीत टाकून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात येते..यात त्या जखमीचे प्राण वाचातातच…परंतु माणुसकीचे वेगळे रूप ही पाहायला मिळते.
हा प्रसंग आहे पुणे सोलापूर महामार्गावर घडलेला.तर घटनेतील जखमीचे नाव आहे आकाश कांबळे. याबाबत जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी दिलेली माहिती अशी की,धाराशिव वरून परत येत असताना सोलापूर पुणे महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक युवक जखमी अवस्थेत पडलेला दिसला.रात्रीच्या वेळी वाहने व वर्दळ असून ही कुणीही सदर जखमी युवकाच्या मदतीला येत नसल्याचे चित्र होते.युवक गंभीर अवस्थेत असताना या युवकाची परिस्थिती पाहता रूग्णवाहिका बोलावत वेळ जाण्यापेक्षा शितोळे यांनी तत्काळ क्षणाचा ही विलंब न करता स्वतःच्या वाहनात जखमी युवकास ठेवले अन् जवळचे रुग्णालय गाठले.
दवाखान्यात दाखल करताच उपचार सुरू केले.सध्या या जखमी युवकाची प्रकृती ठीक असून दौलतनाना शितोळे यांनी केलेल्या मदतीमुळे रुग्णाचे प्राण वाचले आहे. एकीकडे रात्रीची वेळ असताना कोणीही मदतीस येण्यास तयार नसताना शितोळे यांनी धावून जात रुग्णाचे प्राण वाचवले असल्याने त्या युवकाचे ते एकप्रकारे देवदूत बनले आहे. माणुसकी हरवली या बाबत दौलतनाना शितोळे यांनी सांगितले कि रस्त्यात एखादे जखमी प्राणी जरी पडला तरी मदत करणे गरजेचे असताना एक तरुण जखमी असताना नागरीक बघ्याची भुमिका घेत होते हि माणुसकी हरल्याची लक्षण दिसली व्हॅलेंटाईन डे ची गिफ्ट जखमी आकाश कांबळे यांचे नुकतेच लग्न झाले असुन केवळ वेळेत मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी त्यांच्या पत्नी ला मिळालेले हि मोठे गिफ्ट असल्याचे शितोळे यांनी सांगितले .


