पुणे जिल्हामनोरंजनशिरूर तालुका
रांजणगाव गणपती येथे पार पडला होम मिनिस्टर व हळदी कुंकु कार्यक्रम
रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट,निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती, व महिला बचत गट हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
शिरुर ama9
सायंकाळची वेळ महिलांची लगबग ,शेकडो महिला सुखकर्ता लॉंन्स कडे जाताना हळु हळु महिलांन मध्ये उत्साह महिलांची संख्या चार ते पाच हजाराच्या पुढे आणी अतिशय सुंदर आणी नियोजन पुर्व होम मिनिस्टर व हळदी कुंकु कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांची चढाओढ
हे दृश्य होते रांजणगाव गणपती येथे उत्सव नारी शक्तीचा सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा….
रविवार दिनांक ११ रोजी रांजणगाव गणपती येथे रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट,निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती, व महिला बचत गट हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभास अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पुर्वा वळसे पाटील यांनी उपस्थित राहून सर्व महिला भगिणींशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी मंदा वळसे पाटील,मा.जि.प.सदस्या कविता खेडकर,जिल्हा दूध संघाच्या मा.अध्यक्षा केशरताई पवार, ज्योतीताई मानसिंगभैय्या पाचुंदकर, निलमताई श्रीकांत पाचुंदकर,राष्ट्रवादी काँगेसच्या महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, सुषमा शिंदे, ज्योती निघोट, मा.उपसभापती सविता पऱ्हाड,रांजणगाव गणपतीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे.कारेगावच्या सरपंच निर्मला नवले,ढोकसांगवीच्या सरपंच शोभा शेलार,निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला इचके,सोनेसांगवीच्या मा.सरपंच अलका कदम,वाघाळेच्या सरपंच नलिनी थोरात,वरुडेच्या उपसरपंच अहिल्या गोरे, चिंचोलीच्या सरपंच विमल नाणेकर,कान्हूर मेसाईच्या सरपंच चंद्रभागा खर्डे,पिंपळे धुमाळच्या सरपंच अश्विनी धुमाळ, आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील,शिरूर पंचायत समितीचे मा.सभापती विश्वास कोहकडे, प्रा. माणिक खेडकर रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील,युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप शिंदे, तसेच विविध गावचे आजी-माजी पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचे कौतुक करत महिलांनी कुटुंबा बरोबर स्वताहाच्या शारीरीक व मानसीक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले .या वेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमातील प्रथम क्रमांक सौ.राधा नानेकर (फ्रीज व पैठणी)द्वितीय क्रमांक सौ. सुवर्णा पिसाळ (एलईडी टी.व्ही व पैठणी) तृतीय क्रमांक सौ.नम्रता पंचमुख (वॉशिंग मशीन व पैठणी) तृतीय क्रमांक सौ.राधिका मोरे (कुलर व पैठणी)पाचवा क्रमांक सौ.छाया देशमुख (वॉटर फिल्टर व पैठणी) सहावा क्रमांक सौ. दिपाली सुरवसे (मिक्सर व पैठणी) या भाग्य विजेत्या महिलांना किरणताई वळसे पाटील व पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी भव्य बक्षीसे व पंचवीस पैठणी बक्षीसे म्हणुन ठेवण्यात आली होती .
फोटो रांजणगाव गणपती येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचा आनंद महिलांन बसुन घेताना किरणताई वळसे पाटील


