शिरूर तालुका
शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे करून शिवसेना मजबूत करून पक्ष संघटना वाढवावी मित्रपक्ष स्वतःहून आपली दखल घेईल उस्मानाबाद चे खासदार ओम राजे निंबाळकर यांचे मत
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरूर लोकसभा मतदारसंघात तसेच शिरूर तालुक्यात राज्यातील मित्र पक्ष शिवसेना किंवा शिवसैनिकांची दखल घेत नाही कारण या मतदारसंघातून चा खासदार नाहीये आमदार नाही जिल्हा परिषद सदस्य नाही ग्रामपंचायत सदस्य नाही तसेच पक्ष संघटना ही मजबूत नाही यासाठी शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांची कामे करून शिवसेना मजबूत करून पक्ष संघटना वाढवावी मित्रपक्ष स्वतःहून आपली दखल घेईल असा सल्ला उस्मानाबाद चे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी शिवसैनिकाना दिला .
शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिरुर येथील कुंभारआळी येथे मारुती मंदिरात शिवसैनिकांनचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता . त्या वेळी ते बोलत होते .
या वेळी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके ,शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे ,जिल्हा संघटक संजय देशमुख,शहरप्रमुख मयुर थोरात,उपशहरप्रमुख सुरेश गाडेकर व शिवसैनिक उपस्थित होते .
तहसील कार्यालयातील महत्त्वाची कामे व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला तर शिवसैनिकांचे मतदार वाढतील व पक्ष संघटना ही मजबूत होईल असा सल्ला यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी दिला. तुमच्या अडचणी तुम्हाला होणारा त्रास याबाबत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगून, आमच्याकडेही असाच प्रकार होत होता परंतु आम्ही आमची ताकद ऊन दिल्यानंतर मित्र पक्षह जागेवर आला आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
या वेळी बोलताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले शिरूर तालुक्यात व शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसैनिकांना त्रास देण्याचे काम तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची कामे सुरू आहेत. शिवसैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून त्रास देण्याचे काम सुरू आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींशी अनेक वेळा बोललो आहे याबाबत तक्रारही केले आहे असे सांगून शिवसैनिकांनी यापुढील काळामध्ये पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांची कामे करावी असा सल्ला आढळराव पाटील यांनी यावेळी दिला .
चौकट
शिरूर तालुक्यात पक्ष संघटनेची मोठी पदे दिले आहे शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पुढील काळात पदाधिकाऱ्यांनी पदा बरोबर पक्ष संघटना ही वाढवणे गरजेचे असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देऊन पदाधिकाऱ्यांना कान उघडणी केली.
फोटो ओळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार ओम राजे निंबाळकर



