शिरूर तालुका
घरगुती वापराच्या गॅस टाक्या मधुन व्यावसायिक टाक्या मध्ये गॅस भरून त्याची विक्री करणारी टोळी शिरूर मध्ये जेरबंद
शिरूर ama9 वृत्तसेवा
घरगुती वापराच्या गॅस टाक्या मधुन व्यावसायिक टाक्या मध्ये गॅस भरून त्याची विक्री करणारी टोळी शिरूर पोलीसांनी जेरबंद केली आहे .
या बाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे सोमवार दि २३ रोजी रोजी पहाटे मलठण गावचे हददीत शेतामध्ये गॅस सिलेंडर टाक्या मधुन कमर्शियल व्यावसायीक गॅसच्या टाक्यामध्ये पिनच्या कनेक्टरच्या साहयाने बेकायदेशीर पणे भरून बाजारामध्ये चढत्या दराने विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला असता, आरोपी अमोल निवृत्ती फुलसुंदर वय ३९ वर्षे रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे , मलप्पा आमोशीद नरवटे वय ३४ वर्षे , बसवराज लक्ष्मण नानाजे वय ३० वर्षे ,सिध्दाराम विठठल बिराजदार वय ३१ वर्षे सर्व रा. पारीजात बंगल्या मागे मांगडेवाड़ी कात्रज, पुणे हे घरगुती गॅस सिलेंडर टाक्या मधुन कमर्शियल व्यावसायीक गॅसच्या टाक्यामध्ये पिनच्या कनेक्टरच्या साहयाने मानवी जिवीतास धोका होईल अश्या रितीने बेकायदेशीर पणे भरत असताना सापडल्याने त्यांचे ताब्यात भारत गैस एकुण ८० टाक्या, एचपी गॅसच्या एकुण १०० टाक्या, कमर्शियल व्यावसाहीक ९३ टाक्या द छोटया ३ टाक्या तसेच गॅस टाक्या भरण्या करीता वापरण्याच्या एकुण ४० पीन, एक इलेक्ट्रीक वजन काटा, गरम पाणी करण्याकरीता वापरच्या दोन लोंखड़ी टाक्या, दोन भटटी/शेगडी, एक लायटर गॅस टाक्या वाहतुक करण्यासाठी यापरण्याच्या महींद्रा पिकअप नं. एमएच १४ एझेड ५२८१ व महींद्रा जेनीयु नं. एमएच १४ सीपी १३१५ असे एकुण -११,०४,६५०/- रु.चा माल पकडण्यात आला . त्याबाबत सहाय्यक फौजदार नजिम उस्मान पठाण यांनी दिले फिर्यादीवरून आरोपीत यांचे विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढिल अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत. चारही आरोपीना यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे.
वरील कार्यवाही पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनय देशमुख , अपर पोलीस अधिक्षक मिलीद मोहीते ,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , सपोनि अमोल पन्हाळकर, सहा फौजदार नजिम पठाण, पो.ना अनिल आगलावे, पो.कॉ राजेंद्र गोपाळे, पो.अ विशाल पालवे यांनी हि कामगिरी केली .
फोटो ओळी आरोपी समवेत पोलीस अधिकारी



