RANJANGAON GANPATIपुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

रांजणगाव गणपतीत आढळला मृत बिबट्या

 शिरुर प्रतिनिधी

रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पाटील इनाम कचरा डेपोलगत अनिल पाचुंदकर व केशव रोकडे हे सकाळच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना एक बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले,

याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच वनरक्षक वंदना चव्हाण, अभिजित सातपुते, वनपाल शिरूर  बी.स.शिंदे  वनरक्षक, एस.ए.चव्हाण ,रेस्क्यू टीमचे गणेश टिळेकर, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, जयेश टेमकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अंदाजे तीन वर्षे वयाचा नर प्रजातीचा बिबट्या मृत असल्याचे दिसून आले, दरम्यान वनविभागाच्या पथकाने मृत बिबट्याचा पंचनामा करत त्याला ताब्यात घेतले, त्यांनतर वनविभागाच्या वतीने बिबट्याचे अग्नी दहन करण्यात आले .  बिबट्याचा मृत्यू हद्दींचे संरक्षण (territorial dispute) करताना इतर नर बिबट्यासोबतच्या लढाईत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button