पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर मध्ये मोकाट कुत्र्यांच्या विषयावर राजकारण तापले

शिरुर प्रतिनिधी 

दिनांक २६ रोजी शहरातील गुजर मळा येथील भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्या नंतर भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला असुन शहरात या बाबत संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या येत असुन हा विषय फक्त एका भागा पुरता मर्यादीत नसुन हा संपुर्ण शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असुन याचा त्वरीत बंदोबस्त नगरपरीषदेने करावा अशी मागणी पुढे येत आहे .
या बाबत मनसे उपजिल्हाप्रमुख महिबुब सय्यद यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले असुन यात शहरातील भटक्या कुत्रे पकडुन त्यांच्यावर निर्बिजीकरण करण्यात आलेल्या प्रकरणाची प्रक्रियेची चौकशी करावी व भटके कुत्रे हे काय फक्त गुजर मळ्यात आहेत का हा संपुर्ण गावाचा विषय नगरपरिषद या कडे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप सय्यद यांनी केला तसेच कुत्र्याच्या निर्बीजीकरण हे दोन आकड्यात असुन बिले मात्र चार आकड्यात निघाली असल्याचा आरोप सय्यद यांनी करत याची चौकशी झाली पाहीजे हि मागणी केली .
                    चौकट
रविंद्र सानप अध्यक्ष आम्ही शिरुरकर फौंडेशन
मागील दोन वर्षांपासून शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे .तरीही नगरपालिका प्रशासन व कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक हे ढिम्म पणे पाहत आहे काही लोकांनी एकत्र करून मीटिंग घेतली व प्रश्न सोडवण्याऐवजी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय  बर्गे व इतर पालिका कर्मचारी यांचेच बाजू कशी खरी आहे व ते किती प्रामाणिकपणे काम करीत आहे हे दाखवण्याचा देखावा केला आहे . पण तरीही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही म्हणजे एक प्रकारे हे नगर परिषदेचे अपयश आहे ते  लपवण्यासाठी  त्यांनी करीत असलेल्या उपाययोजना कोल्हापुर येथील एका कंपनीला कुत्रे पकडण्यासाठी केलेल्या उपाययोजना सांगितलेली आहे खरे तर कोल्हापूर येथील कंपनीने  आजपर्यंत किती कुत्रे पकडले आहेत व किती कुत्र्यांचे निर्भीजीकरण केले आहे याची सखोल माहिती शहरवासीयांना दिलेले नाही, आणि त्यांना पालिकेने किती पैसे दिलेत हे सांगितलेले नाही पण मोकाट कुत्र्यांचा उच्छाद मात्र थांबलेला नाही
                       चौकट 
शिरुर शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असुन नगरपरिषदेमध्ये प्रशासक असल्याने याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे
प्रशासक फक्त मलिदायुक्त  कामांमध्ये मश्गुल आहे 
नगरपरिषदेचे काही विभाग कमिशन मध्ये व्यस्त आहेत तर सर्वसामान्य शिरुरकर मात्र विविध प्रश्नांनी त्रस्त आहेत 
यावर तात्काळ दखल न घेतल्यास नगरपरिषदेला प्रतिकात्मक रेबीज लस भेट देणार असल्याचे भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button