पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर शहराच्या विकासासाठी मागील पाच वर्षात शंभर कोटीचा निधी

शिरुर प्रतिनिधी

 

 

विद्यमान खासदारांन बद्दल शिरुर लोकसभा मतदार संघात नाराजी असुन मि खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात शिरुर शहराच्या विकासासाठी शंभर कोटी पेक्षा जास्त निधी दिला असुन भविष्यात जास्तीत जास्त निधी शिरुर शहरासाठी शासनाच्या माध्य्मातुन उपलब्ध करुन देणार असल्याचे मत शिरुर चे माजी खासदार व म्हाडा  पुणे चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले 

शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे भेट दिली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिरूर शहरातील अडीअडचणी व नवीन विकास कामे याबाबत पत्रकारांशी चर्चा केली.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे , शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद , नगरपरिषदेचे माजी सभापती विठ्ठल पवार ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार ,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , प्रिया बिरादार, सुजाता पाटील आदी उपस्थित होते .

 

शिरूर शहरासाठी डी पी डी सी मधून आठ कोटी रुपयांची मागणी विविध विकास कामासाठी केली असून शिरूर शहरातील विकास कामाच्या प्रशासनाकडून उदासीनता असून याबाबत नाराजी व्यक्त करीत लवकरच मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगून, येणाऱ्या जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका महायुती बरोबर लढणार असून, वरिष्ठ पातळीवर युती झाली नाही तरच स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तर सध्याचे खासदार दिल्लीवाल्यांना सांगतात मी मतदार संघात आहे तर मतदार संघातील लोकांना सांगतात मी दिल्लीत आहे. याबाबत मतदार नाराजी व्यक्त करतात परंतु मतदानात त्यांनी जे करायचे तेच केले आहे असे सांगून मी मात्र मतदारसंघात पराभवानंतर पहिल्यापासून फिरत असून विकास कामे करत आहे मी माझे काम करत आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

 

 

 

 

शिरूर तालुक्यातील बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करायचा असेल तर जनआक्रोश होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले .

 

तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील  एमईपीएल कंपनीचा प्रदूषणाचा विषय गंभीर असून या कंपनीस नव्याने ६५ एकर जमिन देण्यास विरोध केला होता. परंतु तत्कालीन उद्योग मंत्री यांनी ती जागा दिली असल्याचे त्यांनी सांगून, संपूर्ण राज्यातून घातक कचरा या ठिकाणी आणला जातो त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे या कंपनीच्या मालकावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. जिथे लोक वस्ती नाही. तिथे या कंपनीचा प्रकल्प व्हायला पाहीजे होता तसे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिरूर शहरात असलेली जागा तालुका क्रीडांगणाला कमी पडणार आहे त्यामुळे या तालुका क्रीडांगणासाठी कमीत कमी 25 एकर जागेची आवश्यकता आहे असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगून, शिरूर शहरातील ही जागा व्यापारी संकुल व इतर कामासाठी तिथं उपयोग होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

 

शहरातील 80 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मी केलेल्या प्रयत्नातून आलेली आहे. परंतु काही जनतेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. या पाणीपुरवठा योजनेची कामही दोन ठेकेदार नेमल्यांनी संत गतीने सुरू आहे याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर नगर परिषद प्रशासना च्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. इतर कामातही तिथ परिस्थिती असल्याचे मला नागरिकांकडून समजले आहे याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी बैठक घेण्यातल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

यावेळी चहाच्या गाडीवर वडिलांना मदत करून दहावी बोर्डाच्या परीक्षेत 95.40 टक्के गुण मिळवणाऱ्या अशोक लांडे व त्याचे वडील गजानन लांडे यांचा सत्कार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला शिवसेना शहरप्रमुख मयुर थोरात यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button