पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शहराला दिशा दाखवणारी मागणी! मातोश्री प्रतिष्ठानकडून दिशादर्शक फलकांसाठी पुढाकार

शिरुर  प्रतिनिधी 
शहरात येणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, बस स्थानके यासारखी महत्त्वाची ठिकाणे शोधण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठान तर्फे शिरुर शहरात दिशादर्शक फलक (साईन बोर्ड) लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी  दिनांक १४ मे रोजी प्रतिष्ठानच्या वतीने शिरुर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी  राहुल पिसाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी स्पष्ट व सुस्थितीत दिशादर्शक फलक लावण्याची विनंती करण्यात आली असून, त्यावर शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, महत्त्वाचे चौक व रस्त्यांची दिशानिर्देश माहिती  असावी, अशी मागणी आहे.
निवेदन देताना मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर, हुडको कृती समितीचे संघटक  शैलेश जाधव आणि  सतीश केदारी उपस्थित होते.
शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी ही पायरी उपयुक्त ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button