गुन्हेगारीपुणे जिल्हाशिरूर तालुका

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरात चोरी करणारा सराईत केला जेरबंद

शिरुर प्रतिनिधी
जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरात चोरी करणारा सराईत केला जेरबंद, चार मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक किलो ग्रॅम चांदी व अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात  आला आहे.
जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मंदिर चोरीचे गुन्हयांमध्ये अचानक वाढ झाली होती. यामध्ये आळेफाटा, ओतूर, मंचर, पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने  पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून जुन्नर विभागात गुन्हे प्रकटीकरणाचे काम पाहणारे पथकास नेमले होते.
आळेफाटा पो स्टे मध्ये  दि.२९ एप्रिल  रोजी दाखल गुन्हयाचा समांतर तपास स्थागुशा चे पथकाने सुरू केला असता, सदर गुन्हयाचे व इतर सर्व गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सर्व मंदिर चोरी मध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा, मंचर, पारगाव पो स्टे हद्दीतील मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा आढळून आला. सदर सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित आरोपीचे फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखविण्यात आले. सदरचा संशयित हा संतोष एकनाथ बर्डे असून तो अकलापूर संगमनेर येथील राहणार आहे. तसेच तो फिरस्ता असून मिळेल त्या ठिकाणी मजूरी काम करतो. मिळालेल्या बातमीचे आधारे तपास सूरू केला असता, आरोपी हा अकलापूर येथे मिळून आला नाही. त्याचा जुन्नर तालुका परिसरात शोध घेत असताना दि. ३० एप्रिल  रोजी स्थागुशाचे पथक सदर संशयिताचा शोध घेत असताना तो आळेफाटा परिसरात आला असल्याची बातमी मिळाली. बातमीचे आधारे सापळा लावून पथकाने आरोपी संतोष एकनाथ बर्डे वय ५० वर्षे रा. अकलापूर ता. संगमनेर जि अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवनू तपास केला असता त्याने धोलवड, लौकी, धामणी गावातील मंदिरामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले असून आरोपीने एकूण चार गुन्हे केल्याचे सांगितले आहे. त्याचेकडून चोरी केलेले ०१ किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १,५०,०००/- किं. चा. मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
पोलीस स्टेशन आळेफाटा,ओतुर ,पारगाव ,मंचर असुन
नागरीकांचे श्रद्धास्थान असणारे मंदिरामध्ये चोरी झाल्याने नागरीकांमध्ये नाराजी होती. चोरीच्या घटना चिंतेचा विषय झालेला असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देवून वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना केल्याने मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वस्तीतील मंदिरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच मंदिरातील दागिन्यांचे सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना करणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे.
सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्रकुमार चौधर जुन्नर विभाग,  उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो नि दिनेश तायडे, स्थागुशाचे अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, राजु मोमीण, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पो स्टे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button