पाच कंदील चौक घेतोय मोकळा श्वास बांधकामधारकाने सुरु केली पार्किंगची व्यवस्था

शिरुर प्रतिनिधी
शिरुर नगरपरिषद हद्दीतील पाच कंदिल चौकातील एका बांधकामधारकानी इमारत उभी करत असताना कुठल्याही प्रकारचे पार्कींगची व्यवस्था केलेली नसल्याने आणी सदर इमारतीत सुरु असणारया व्यवसायामुळे सर्व दुचाकी रस्त्यावरच पार्क होत असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता सदर बांधकाम धारकाने शिरुर नगरपरिषदेकडून घेतलेल्या बांधकाम परवानगीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले असल्याबाबत भुमीपुत्र प्रतिष्ठाणने नगरपरिषदेला तक्रार केली होती
यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते याचीच दखल घेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी संबधित बांधकाम धारकाला नोटीस देऊन पार्किंग संदर्भात व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या होत्या अन्यथा भोगवटाप्रमाण पत्र रद्द करण्याचे देखील कळविले होते संबधित बांधकामधारकाने पार्किंगची व्यवस्था केल्याने शहरातील पाच कंदिल चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला या विरोधात भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी नगरपरिषदेला लेखी तक्रार केली होती
नगरपरिषद हद्दीतील पाच कंदील चौक येथे बांधकामधारकानी बांधकाम करताना कुठल्याही पार्किंगची व्यवस्था केली नसल्याने स्थानिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच सदर इमारतीत एक मोठी बॅंक सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्तावर लागत आहेत स्थानिकांसह अनेकांनी वारंवार नगरपरिषदेकडे पार्किंग संदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या अखेर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर बांधकामधारकाने पार्किंगची व्यवस्था केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.



