पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
अक्षयतृतीया निमित्त महागणपतीस ५००१ आंब्याचा महानैवैद्य

शिरुर प्रतिनिधी
रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीला अक्षयतृतीया निमित्त ५००१ आंब्यांच्या महानैवेद्य दाखवण्यात आला .
रांजणगाव येथील श्री महागणपतीस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीय्या निमित्त ५००१ आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. तसेच देवस्थान ट्रस्ट च्या मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महागणपतीला दाखविण्यात आलेला आंब्यांचा महानैवेद्य सायंकाळी महागणपतीच्या सामूहिक आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला अशी माहिती देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान हे अष्टविनायकातील महत्वाचे व आठवे स्थान आहे. अक्षयतृतीय्या निमित्त पहाटे ५ वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. तसेच दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आला. अक्षयतृतीय्या निमित्त गणेशभक्त किरण मेणकर व बाळकृष्ण जांभळे यांच्या तर्फे महागणपती ला ५००१ आंब्यांची आरास करण्यात आली.
यावेळी देवस्थान विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी तसेच ग्रामस्थ व मान्यवर , देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.


