आरोग्यपुणे जिल्हाशिरूर तालुका
शिरुर मध्ये महाराष्ट्र दिन व दुर्ग दिन निमित्त भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजीत

शिरुर प्रतिनिधी
शिरुर येथील सह्यादी प्रतिष्ठानच्या तसेच वुई लव शिरुर च्या वतिने महाराष्ट्र दिन व दुर्ग दिन निमित्त भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजीत केले आहे
गुरुवार दिनांक 1 मे रोजी
सकाळी 10:00 ते सायं 5:00 वा. पर्यंत शिरुर नगरपालिका मंगल कार्यालय येथे हे शिबीर आयोजीत करण्यात आले असुन या शिबीराचे उद्घाटन उद्योजक सागर दंडवते यांच्या हस्ते होणार आहे
या वेळी सर्व रक्तदात्यांना अंतः अस्ति प्ररंभ हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबीरात सहभाग घ्यावा असे आवाहन सह्यादी प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे
आपले ‘रक्त’ 🩸हे एखाद्याला जीवन देवू शकते… याच भावनेतुन आपण ‘रक्तदान’ करता. त्यातूनही उन्हाळ्याच्या दिवसात रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा असतो. अचानकपणे आपल्यापैकी परिवार, नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या जवळच्यांना रक्ताची गरज लागल्याचा सर्वांना अनुभव आलेला असतो. अशावेळी रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आपण दरवर्षी “रक्तदान” शिबिर आयोजन करीत असतो.आपल्या रक्ताच्या थेंबा मध्ये जीवन आहे, कृपया ते दान करा “रक्तदान” करा !रक्तदान….. श्रेष्ठदान !!


