Uncategorized

शिरूर येथे बंडखोर आमदारांचा निषेध

शिरूर  वृत्तसेवा 
 राज्यातील शिवसेना पक्षातील आमदारांच्या  अंतर्गत बंडाळीच्या पार्श्वभूमीवर  शिरूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर  बंडखोर आमदारांचा निषेध करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

या वेळी ‘उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्यासोबत’ अशा आशयाचे फलकही शिवसैनिकांनी झळकावले. ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर केला. त्यानंतर फुटीर आमदारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
या वेळी या वेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार ,युवासेना पुणे जिल्हा अधिकारी बापुसाहेब  शिंदे , शिरूर आंबेगाव ३९ गावाचे तालुकाअध्यक्ष गणेश जामदार, शिरूर शहरप्रमुख मयूर थोरात, युवा सेना शहर अधिकारी सुनील जाधव ,उपतालुका प्रमुख अनिल पवार,शहर संघटक राजेंद्र शिंदे, स्वप्नील रेड्डी, योगेश ओव्हाळ,
उपजिल्हा संघटिका शैलजा दुर्गे,तालुका महिला समनव्यक सुमन वाळुंज , राजेंद्र चोपडा,सुनिल जठार आदी उपस्थित होते.
 

या वेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार म्हणाले कि सर्व सामान्य मराठी माणसांनच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेचा जन्म झाला असुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  त्यातून अनेक सामान्यांना आमदार ,खासदार केले  . पण त्यांच्या जिवावर मोठे झालेल्यांनी दिलेला धोका हा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही खपुन घेणार नाही असे शेलार या वेळी म्हणाले . युवा सेना पुणे जिल्हा अधिकारी बापूसाहेब शिंदे म्हणाले कि शिवसेनेशी गद्दारी करणारे  आणि शिवसैनिकांच्या निष्ठेचा अपमान करणारे फुटीर आमदार महाराष्ट्रात स्वाभिमानाने  कुठेही फिरू शकणार नाहीत  असा इशारा बापूसाहेब शिंदे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button