शिरूर तालुका
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी सात जणानचा उमेदवारी अर्ज दाखल
शिरूर
रावसाहेबदादा पवार
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी सात जणानी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी दिली .
कारखान्याचे विद्यमान चेअरमन व आमदार ॲड अशोक पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
दिनांक २४ रोजी संभाजी शिवाजी फराटे यांनी मांडवगण फराटा ,आमदार ॲड . अशोक पवार वडगाव रासाई दोन अर्ज ,मा .जिल्हा परिषद सदस्या सुजाता अशोक पवार वडगाव रासाई ,वाल्मिकी धोंडीबा कुरुंदळे शिरुर ,उत्तम रामचंद्र सोनवणे अ. जा . ज ,सुजाता अशोक पवार महिला राखीव या मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असलेला साखर कारखाना म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखाना ओळखला जातो.या कारखान्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असून २४ जुन ते ३० जून पर्यंत अर्ज दाखल केले जाणार असून दाखल केलेल्या अर्जाची छाननी १ जुलै रोजी पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची मुदत १८ जुलै पर्यंत राहणार असून ३१ जुलै रोजी मतदान होणार आहे.तसेच मतमोजणी १ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. या कारखान्यावर आमदार अशोक पवार यांची सत्ता असली तरी यावेळी प्रथमच सर्वपक्ष एकत्र येत घोडगंगा किसान क्रांती पॅनेल उभा राहिला आहे.त्यामुळेही या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




