Uncategorized
रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्यासाठी आज २६ अर्ज दाखल
शिरूर
शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून सोमवार दि.२७ रोजी २१ जणांनी २६ अर्ज दाखल झाला आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असून सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.सध्या अर्ज दाखल करण्यसाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे.
याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर कुंभार यांनी सांगितले की,सोमवार दि.२७ रोजी सर्वसाधारण गट क्र.१ मांडवगण फराटा मधून संभाजी शिवाजी फराटे -२ अर्ज,दिलीप आनंदराव फराटे,दत्तात्रय वाल्मीक नागवडे, बाळासो बबन जगताप,
सर्वसाधारण गट क्र.२ इनामगाव मधून नरेंद्र अण्णासो माने – २
सर्वसाधारण गट क्र.३ वडगाव रासाई मधून सुरेश मारुती ढवळे – २ अर्ज, ऋषिराज अशोक पवार,
सर्वसाधारण गट क्र.४ न्हावरे मधून भाऊसो सर्जेराव भोसले,शरद मोहनराव निंबाळकर – २ अर्ज,सागर आबासाहेब निंबाळकर,
सर्वसाधारण गट क्र.५ तळेगाव ढमढेरे मधून सुरेश रामचंद्र पलांडे,संपत विठ्ठल ढमढेरे,
सर्वसाधारण गट क्र.६ शिरूर मधून राजेंद्र रणजित जगदाळे- २ अर्ज,प्रभाकर नारायण पाचुंदकर,वाल्मीक धोंडीबा कुरंदळे,
संस्था ब गट – ऋषिराज अशोक पवार,सुजाता अशोक पवार,
महिला प्रतिनिधी – सीमा दत्तात्रय फराटे,जयश्री विलास नागवडे,वैशाली सुनील जगताप,
भटक्या विमुक्त जाती जमाती, वि.मा.प्र.प्रतिनिधी मधून बिरा बाबू शेंडगे आदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.


