Uncategorized
कृषी महाविद्यालय दापोली येथील रा.से.यो च्या स्वयंसेवकांकडून वृद्धांना साक्षरतेचे धडे
शिरुर वृत्तसेवा
कृषी महाविद्यालय दापोली येथील शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी ,गौरेश चव्हाण या रा.से.यो च्या स्वयंसेवकांनी जालगाव ग्रामपंचायत अंतर्गत पाटील वाडी येथील वृद्धांना स्वाक्षरी करायला शिकवली, जे वृद्ध त्यांच्या शिकण्याच्या काळात काही कारणास्तव शिकू शकले नाही, स्वाक्षरी करताना त्यांच्यात खूप उत्साह बघायला मिळाला. जे वृद्ध स्वतःची ओळख दाखवण्यासाठी अंगठा देत असत, त्यांना स्वाक्षरी करायला शिकवून स्वयंसेवकांनी चांगली कामगिरी निभावली.

