शिरूर ama9 वृत्तसेवा विद्याधाम प्रशाला शिरुर घोडनदी या शाळेतून १९९३ मध्ये शालांत परीक्षा देवून बाहेर पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांची . १३ नोव्हेंबर २०२२ ला जणू पुन्हा शाळा भरली. आमचे बालमित्र मैत्रिणीचे गेट टु गेदर तब्बल २९ वर्षानी शिरुर मधील शिवतारा कृषि पर्यटन केंद्रावरील निसर्गरम्य परिसरात झाले . आमच्या या शाळेसाठी १०० हून अधिक विद्याधाम प्रशालेचे इयत्ता दहावीच्या सन १९९३ च्या बॅचचे विद्यार्थी हजर होते.
अनेक वर्षा पासून आपल्या ९३ च्या बॅचचे गेट टू गेदर व्हावे या बाबत चर्चा होत . त्यानुसार कल्पना- संकल्पना मांडल्या जात होत्या. या सगळ्याला खरी गती मिळाली ती मागील दोन महिन्यात . सन १९९३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या सर्व मित्र मैत्रीणाना शोधणं, त्याच्या मोबाईल नंबर मिळविणे ,त्यांना एकत्र आणणं, गेट टू गेदर नियोजन, गेट टु गेदरला आवश्यक आणि ऐच्छिक वर्गणी गोळा करणे ,मित्र मैत्रीण यांच्या कलागुण सादरीकरणासाठी प्रोत्साहन देणं यांसारखी महत्वाची कामे स्वंत :हून काही मित्र मैत्रीण यांनी उत्साहानं पार पाडली. या कामात सतीश धुमाळ, परेश बोरा , अतुल बोथरा , स्वाती थोरात , विद्या वाघमारे , वर्षा काळे , विनय संघवी , प्रशांत थोरात चंद्रकांत कनिंगध्वज ,सचिन घोडके ,विनोद बोथरा ,गणेश खोले ,मध्यकांत पानसरे यांनी विशेष पुढाकार घेतला .
यावेळी प्रास्ताविक विनय संघवी यांनी केले .
प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे , वर्षा काळे ॲड. श्रीरंग कडवेकर , विकास पोखरणा ,सविता नरवडे ,सतीश धुमाळ ,मिथिला जोशी ,ॲड. वीरेंद्र सावंत , सुरेखा दिवटे यांनी केले .
दिनविशेष तुषार दळवी यांनी सांगितला तर सूत्रसंचालन विद्या वाघमारे व स्वाती थोरात यांनी केले . प्रवेशद्वारा लगत अनिता भोगावडे यांनी सुंदर अशी रांगोळी काढली .
एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी आवर्जून मुंबई हून येत स्नेह समेंलनास हजेरी लावली आपला वर्ग मित्र उच्चपदस्थ आधिकारी झाल्याचा आनंद यावेळी सर्वानी व्यक्त केला .त्याने ही आपल्या मित्रांशी हितगुज केले .स्नेह समेंलनाचा यशस्वीते करिता अनेक मित्रांनी आपआपल्या परीने हातभार लावला. या बॅचमध्ये डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, शासकिय आधिकारी , शिक्षक , उद्योजक ,व्यापारी ,व्यवसायिक शेतकरी , लोकप्रतिनिधी अश्या सर्वांचा समावेश आहे. या स्नेह समेंलनासाठी बेंगलरू ,नांदेड, पुणे , पिंपरी चिचवंड , नवी मुंबई , सांगली ,अहमदनगर ,कल्याण , डोंबिवली ,परभणी महाड , अशी राज्यभरातून माजी विद्यार्थी आले होते .
१३ नोव्हेंबरला गेट टु गेदरचा सकाळी कार्यक्रम स्थळी सर्व मित्र मैत्रीणीचे औक्षण करुन व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले . स्वागता नंतर नाव नोंदणी करुन प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीचे संकलन करण्यात आले. उडीदवडा , इडली सांबार ,पोहे ,गुलाबजाम चहा , कॉफी दूध ,बिस्किटे अश्या नाष्टा सर्वांसाठी होता त्याच्या ही आस्वाद सर्वानी घेतला . बरोबर ११ वाजता शाळेची घंटा वाजली. सुरुवातीला सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन त्यानंतर सर्व मित्र मैत्रीण यांनी शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले. प्रशालेत नित्यनेमाने सांगण्यात येणाऱ्या दिनविशेष ही सांगण्यात आला .तुषार दळवी यांनी दिनविशेषाचे वाचन केले . यावेळी सन १९९३ चा दहावीचा तुकडीत असणारे पण आता या जगात नसणारे ७ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीस व माजी शिक्षक व बॅच मधील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या कुटुंबातील सदस्याना श्रध्दांजली प्रस्ताव प्रशांत थोरात यांनी मांडला व त्यानंतर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .त्यानंतर पुन्हा नव्याने प्रत्येकाने आपली ओळख करुन दिली ओळख करुन दिली की दहावीतील तो किंवा ती याच्यात किती फरक पडला अशी चर्चा झडत होती .त्याच बरोबर ओळ्खी नंतर दहावीतील टोपणनावाने काहीनी हाक मारली . मुल ते प्रौढ असा आपल्या प्रवास कसा पटकन झाला याचे चित्र सर्वांच्या मनपटलावर उमटत होते .
कार्यक्रमस्थळी शाळा व शाळेत शिकविला जाणाऱ्या विषयाच्या पुस्तकांची चित्रे उपक्रमाची चित्रे यांचा असणारा फलक लक्ष वेधून घेत होता. त्याच बरोबर सन १९९० ते १९९५ या वर्षा मधील प्रसिद्ध हिंदी व मराठी चित्रपट गीते लावण्यात आल्याने सर्व जण आपल्या त्या काळातील आठवणीत हरखून गेले . प्रशालेचे असणारे प्रशाला गीताचे सामूहिक गाण यावेळी करण्यात आले या गीतात ‘ जगात जावू कोठे जरी ही गर्जत ठेवू विद्याधाम ‘ ही ओळ आल्या नंतर आतिशय अभिमानाने व खड्या आवाजात या ओळी सर्वानी म्हणाल्या. त्याच वेळी आपण विद्याधाम प्रशालेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान व कृतार्थता प्रत्येकाचा चेहरावर झळकत होती .
याच वेळी सर्वांच्या गृप फोटो व मित्र मैत्रीणी सह फोटोसेशन पार पाडले . सेल्फी पॉईंट वर ही फोटो आपल्या खास मित्र मैत्रीण यांचा बरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती..
त्यानंतर सर्वानी भरपेट भोजनाचा आस्वाद घेतला .भोजनात दुध रबडी , जिरा राईस , दाल तडका , मटकी , पनीर , कोंथबीर वडी , बाजरी भाकर , फलका , पुरी असा बेत होता .त्याच बरोबर मसाला पान ही देण्यात आले .
दुपारच्या विविध गुणदर्शनाच्या सत्राचा कार्यक्रमात या अनेकांनी आपली कला सादर केली . त्यात ॲड .श्रीरंग कडवेकर ,प्रीतम दरडा ,स्वाती थोरात गोरखनाथ निघूल , परेश बोरा आदीनी गाणी सादर केली .काहीनी आपले व्यवसायिक अनुभव तर सविता नरवडे, मिथिला जोशी ,शिक्षीका अनिता भोगावडे , तुषार दळवी , डॉ. धीरज सुराणा , हेमंत सोनवणे , निलेश लंटाबळे , अजित मोरे आदीनी मनोगते व्यक्त केले .त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यानी ” हम होगे कामयाब ” हे समूहगीते सामूहिकपणे म्हटले.त्याने वातावरणाचा माहौल आधीकच चैतन्यमय व उत्साही झाला .आभार प्रा . सतीश धुमाळ यांनी मानले .
सर्वानी शेवटी लोकप्रिय हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरित केलेले नृत्य सर्वाच्या आयुष्यात सदैव स्मरणात राहील असे झाले .जणू लहान मुले बनुन सर्व मित्र मैत्रीणीनी डान्स केला .सर्वाना या गेट टू गेदरची आठवण म्हणून विद्याधाम प्रशाला ९३ असा उल्लेख असणारा बिल्ला , आकर्षक टोपी , गृप फोटो , कार्यालयीन बॅग व मिठाई बॉक्स व श्रीरंग कडवेकर यांच्या वतीने सॅनिटायझर भेट म्हणून सर्वाना देण्यात आली .
सर्वानी चहा कॉफी बिस्किटे व गरम भजी व सॅडविच चा आस्वाद घेतला .
त्यानंतर सर्व जण विद्याधाम प्रशालेत गेले .२९ वर्षात प्रशालेत झालेल्या बदल पाहिला आपण ज्या वर्गखोल्या बसत होतो. त्या वर्ग खोल्यात जावून बॅचेस वर काही मिनिटे मुले मुली बसली विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या वर्गात आपण शिकलो त्या वर्गात कोणत्या बेंच वर बसायचो ते ही एकमेकांना आवर्जून सांगत होते. अनेकांनी शाळेत प्रवेश करताना शाळेच्या पायरीवर नतमस्तक होत नमस्कार केला. नतमस्तक होत असताना अनेकांचे डोळे पाणवत होते. प्रशालेत नव्याने बांधण्यात आलेले प्रेक्षागृह ही विद्यार्थ्यानी आवर्जून पाहीले शाळेचा व्हरडा व प्रयोगशाळा व ग्रंथालयात ही फेरफटका मारला ज्या शाळेने आपणांस घडविले त्या शाळेविषयी अपार आदर व प्रेमाची भावना व्यक्त करित सर्व विद्यार्थी प्रशालेतून आपआपल्या घराकडे मार्गस्थ झाले . गेट टू गेदरचा हा कार्यक्रम कधीच संपू नये असेच सर्वाना वाटत होते पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा भेटायच आणि आनंद लुटायचा व घ्यायचा हा संकल्प करत एकमेकांच्या सर्वानी निरोप घेतला .
त्याखेरीज या गेट टू गेदरची कायमस्वरूपी आठवणीसाठी व पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून सुमारे ५० फळझाडे शिरुर शहरातील डोंगरावर लावण्यात आली .
मैत्रीचा सहवास ही लाखो दर्द की दवा आहे असे म्हणतात त्याची प्रचिती आली आपण किती ही मोठे झालो , श्रीमंत झालो तरी ही आपली मैत्री हीच आपली श्वावत व खरी श्रीमंती असते . गेट टु गेदरच्या निमित्ताने झालेल्या मित्रांशी संवाद व सहवास याची उर्जा जीवनात येणाऱ्या अनेक संकटाना तोंड देताना टॉनिक सारखी शक्तीवर्धक ठरते हे निश्चित .
अशी ही उर्जा दरवर्षी गेट टू गेदरचा रुपाने घ्यायची व दरवर्षी पुन्हा नक्की भेटायच असे वचन देत सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला .
यार मेरी जिंदगी
यार मेरी शायरी
यार मेरी दवाई
यार मेरे जीवन की सबसे
बडी ताकद और मजबूरी
ये खुदा बस्स इतना ही करना
यार मेरा मुझसे कभी जुदा ना करना
सुख और आनंद से झोली यार की भर देना
उसका दु : ख तकलीफे और रास्तो के कॉटे मुझे दे देना .
जब भी जिस राह से मेरा यार निकले
उस राह पर खुशिया ही खुशिया देना .
यारो की मैफिल मेरी यु ही बनाये रखना
यारोके वास्ते जीना क्या मरना भी मंजूर है .
यारो के लिये दुनियासे भी लढना मंजूर है .
ये खुदा इतना एक काम करना मर भी मै जाउ तो भी मै जिंदा यारोंके
दिल मे रह सकू ऐसा काम मेरे हातोसे
करने का सौभाग्य मुझे देना .
यार की एक मुस्कान
मेरे जीवन राह की मंजिल है .
यारो के वास्ते हर जन्म कुर्बानी
देना मंजूर है .
या गेट टू गेदर मध्ये
या स्नेह समेंलनात प्रशांत तुकाराम थोरात
ॲड.सयाजी पोपटराव गायकवाड, पियुष सुमतीलाल दुगड,नामदेव महाराज, सचिन संभाजीराव शेळके, विनय वसंतलाल संघवी, मिथीला रामचंद्र जोशी, अतुल कांतीलाल बोथरा अनिल राजाराम सोनवणे, सतिश पांडुरंग धुमाळ, अर्चना यादव
, नवनाथ (दादा) साबळे
,जयेश चंदनमल साखला , परेश प्रकाश बोरा, वर्षा पोटावळे (काळे), गणेश गुलाबराव खोले, स्वाती गौतम जाधव (थोरात), शालन केरु थोरात( पठारे ), डॉ.मदन वसंत जोशी , मनेश कोठारी, विद्या विवेक सोळसे ( वाघमारे), राजेंद्र वसंत लोखंडे , दिपाली कोठारी (चोरडिया) , जावेद सय्यद, सुरेखा नरसु चिकणे , सोन्याबापू नवले, शंकर दादाभाऊ गायकवाड
, अशोक दत्तात्रय नवले
, संतोष नवले , ॲड.विरेंद्र भानुदास सावंत, सचिन कोठारी
, नवनाथ मल्हारी वाखारे
, सुनंदा कोंडाजी पडवळ , सुरेखा ज्ञानदेव पळसकर (दिवटे), संजय रघुनाथ तंटक
, नितीन नवले, निलेश शिवाजीराव लंटाबळे, गोरख निघुल , डॉ.प्रताप आबासाहेब गायकवाड, अतुल सुरेश चव्हाण, डॉ.जीवन विठ्ठल खोसे
,प्राजक्ता बाळकृष्ण गुरव
, चेतन नारायणराव निंबाळकर, डॉ.अमित रमेश कर्नावट, सचिन रत्नाकर घोडके, महेश हनुमंतराव सणसे , प्रकाश खेडकर, डॉ.रीना रमेश बोरा , चैताली कांतीलाल बोरा (कटारिया), विनोद सुभाषलाल बोथरा , हरेश वसंतलाल धाडीवाल, विनोद हरिलाल पटेल, रुपेश अशोक संघवी, तुषार पंढरीनाथ दळवी,चंद्रकांत काशिनाथ कनिंगध्वज, डॉ.धीरज धनराज सुराणा, प्रीतेश कांतीलाल रुणवाल
, प्रीतम मदनलाल दरडा , शितल कांतीलाल दुगड , आशुतोष सुरेश जैन
, मतीन सय्यद, विकास सुवालाल पोखरणा
, संतोष हिरामण चौधरी
रोहित वसंतलाल गादिया, अमोल निवृत्ती महाजन, सतीश तुकाराम गोरे, डॉ.विठ्ठल धावडे, श्रीरंग श्रीपाद कडवेकर, अनिल लोंढे, जालिंदर रंगनाथ पाडळे
, सविता नरवडे (बोरुडे)
, प्रिती कोठारी, अस्मिता स्वरुपचंद कोठारी, जयश्री कैलास बत्ते
, मुकेश राजकुमार संघवी, राणी कोठारी, अतुल कोहकडे, संगीता राममुर्ती नरवडे (शिंदे)
, हनुमंत मानसिंग वाबळे
, आदेश रमेश धाडीवाल
, निलेश रमेश धाडीवाल
, संदिप सुरेश अभंग
, प्रसिदा नायर, राखी चोपडा (छाजेड), डॉ .भारती रणपिसे, शोभा मारुती वाखारे (रोडे), अर्चना पाटोळे (चव्हाण), आनंद सुराणा हेमंत सोनवणे, किशोरी काशिनाथ केदारी, सुवर्णमाला दत्तात्रय भुजबळ, सुजाता एकनाथ भुजबळ, रमेश नरसू चिकणे, सुनील मारुती वडघुले, शशिकांत बापूराव फंड, मध्यकांत उमाजी पानसरे, अनिता हनुमंत भोगावडे, निलम चोपडा
,राजेंद्र बापूराव गोऱ्हे, अजित शंकर मोरे
, निलेश चंपालालजी मुथा, सचिन दिलिप चोपडा, विनीत प्रकाशचंद बोरा, सुर्यकांत दत्तात्रय भुजबळ, सुजाता ठकसेन दिवटे, तृप्ती गिरीश दुधेडिया , वसंत प्रभू शिंदे, राजाराम महादेव सरोदे, हेमंत शरद नायडू, किर्ती जामदार, विजय नरके , आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते .
==================
आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग व येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षानी गेट टू गेदरचा निमित्ताने एकत्रित आलेल्या विद्याधाम प्रशाला शिरुरच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वीच्या तुकडीतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावली .
शहरातील शिरुर देवराई सह्याद्रीचा वतीने पुणे नगर डोंगरावर हॉटेल अंबिकाच्या मागील वनखात्याचा डोंगरावर झाडांचे विशेषत फळझाडांचे बन उभे राहात आहे याठिकाणी विद्याधाम प्रशालेच्या सन १९९३ च्या दहावीच्या तुकडीतील विद्यार्थ्यानी ५० फळझाडे याठिकाणी लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला .त्याच बरोबर वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या देवराई सह्याद्री शिरुरच्या टीमकडे सन १९९३ च्या बॅचच्या वतीने टिकाव ,घमेले ,खोरे , पंजा असे साहित्य भेट म्हणून देण्यात आले .
==================
प्रा सतीश पांडुरंग धुमाळ
This comment has been removed by the author.